Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं (Aishwarya Rai Bachchan) काही दिवसांपूर्वी  पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. तिनं पेरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक देखील केला होता. ऐश्वर्या रायच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या लूकला ट्रोल केलं आहे.

Continues below advertisement


पॅरिस फॅशन वीकसाठी ऐश्वर्यानं गोल्डन कलरचा शिमरी गाउन आणि मोकळे केस असा लूक केला होता. पॅरिस फॅशन वीकच्या रॅम्पवर ऐश्वर्यानं केंडल जेनरसोबत डान्स देखील केला. आता पॅरिस फॅशन वीकमधील ऐश्वर्याच्या व्हायरल झालेल्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी ऐश्वर्याच्या लूकला ट्रोल केलं आहे.


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


एका नेटकऱ्यानं ऐश्वर्याच्या व्हायरल फोटोला कमेंट केली, 'ती खूप जाड दिसत आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ती खरोखरच म्हातारी दिसते आणि तिचे वजन खूप वाढले आहे! ती पूर्वीसारखी सुंदर दिसत नाहीये'






ऐश्वर्यासोबतच  ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची भाची आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिने देखील 'पॅरिस फॅशन वीक' मध्ये रॅम्प वॉक केला. तसेच 'पॅरिस फॅशन वीक' या फॅशन शोमध्ये केंडल जेनर, इवा लॉन्गोरिया, अँडी मॅकडोवेल, हेलन मिरेन, अजा नाओमी किंग, व्हायोला डेव्हिस यांसारख्या इतर सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. 


पाहा ऐश्वर्याच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ






ऐश्वर्याचे चित्रपट


पोन्नियिन सेलवन या चित्रपटातून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली. या   पोन्नियिन सेलवन-2 या चित्रपटात देखील तिनं काम केलं.  हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता ऐश्वर्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Paris Fashion Week: पॅरिस फॅशन वीकमध्ये मामी-भाचीचा जलवा; ऐश्वर्या आणि नव्या नवेली नंदाच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ व्हायरल