Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्गातही (Sindhudurg) गौतमीला नो एन्ट्री आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमीच्या डीजे डान्स शो आयोजित करण्यात आला होता. मात्र अनेकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवल्यानंतर आयोजकांनी तांत्रिक कारण देत कार्यक्रम रद्द केला.
7 आणि 8 ऑक्टोबरला कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमी पाटीलचा डीजे डान्स शो होता आयोजित करण्यात आला होता. 8 ऑक्टोबरला कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे मराठा समाज हॉल येथे सकाळी 11 वाजता आणि कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठाण येथे सायंकाळी पाच वाजता 'गौतमी पाटील डीजे डान्स शो' (Gautami Patil DJ Dance Show) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण काही तांत्रिक कारणांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
गौतमीचा कार्यक्रम जरी रद्द झाला तरी 7 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेला 'कॉमेडीचे सुपरस्टार' हा कार्यक्रम मात्र पार पडणार आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'तील कलाकार हा कार्यक्रम करणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. देवगड अम्युझमेंट सेंटरचे धैर्यशील पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोल्हापुरात गौतमीला नो एन्ट्री!
कोल्हापुरातील गौतमी पाटीलचे सप्टेंबर महिन्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उत्सव काळात कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.
माझ्या कोणत्याही कार्यक्रमात गोंधळ होत नाही : गौतमी पाटील
बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील म्हणाली होती,"माझ्या कोणत्याही कार्यक्रमात गोंधळ होत नाही. जर एखाद्या कार्यक्रमात गोंधळ झाला तर लोक तेच धरुन बसतात. काही अपवाद वगळता माझे कार्यक्रम शांततेत पार पडत असतात".
गौतमी पाटीलचा 'घुंगरू' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आली नसली तरी या महिन्यातच हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. गौतमीचं 'दिलाचं पाखरू' हे नवं गाणं येत्या 13 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी तिचं 'माझा कारभार सोपा नसतोय रं' हे गाणं प्रदर्शित झालं होतं.
संबंधित बातम्या