Sur Nava Dhyas Nava : संगीताचं खरं सौंदर्य म्हणजे ते कुठलीही मर्यादा न जुमानता लोकांना जोडतं. संगीत (Sur Nava Dhyas Nava) न आवडणारा व्यक्ती या जगात शोधून देखील सापडणार नाही. संगीत प्रत्येकाच्या आयुष्यात नवचैतन्य आणत, उभारी आणत... संगीत म्हणजे ध्यास, निखळ आनंद. कोणत्याही कलेला आपण एखाद्या साच्यात बंदिस्त करून ठेऊ शकत नाही. अगदी तसंच गाण्याचं देखील आहे.


आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस असा एक संगीतमय कार्यक्रम येणार आहे. ज्याने तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या कार्यक्रमात आपण गाण्याच्या विविधशैली ऐकल्या, त्यांनी आपली मन देखील जिंकले आणि आता हा मंच पुन्हाएकदा सज्ज झाला आहे, महाराष्ट्रातल्या संगीत प्रेमींनसाठी काहीतरी नवीन घेऊन.  प्रेक्षकांचा आवडता चैतन्यपूर्ण गाण्यांचा सांगीतिक कार्यक्रम 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' (Sur Nava Dhyas Nava) हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होत आहे. 


'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा'  कार्यक्रमाचा रंगमंच सूर आणि तालाने पुन्हा बहरणार आहे. पण यावेळेस जरा वेगळे घडणार आहे. आपण म्हणतो ना जुनं ते सोनं असतं, पण... नवंही  हवं  असतं. आजवर या मंचावर आपण सगळ्यांनी अनेक सुप्रिसद्ध गाणी ऐकली त्यांचा आनंद घेतला. पण आता मात्र या गाण्यांना आजची तरुण पिढी एका नव्या ढंगात, नव्या रुपात सादर करणार आहेत आणि हे शिवधनुष्य या कार्यक्रमातील स्पर्धकांनी उचलले आहे. रंगमंचावर सप्तसुरांची उधळण होणार, नवनवे आविष्कार प्रत्येक आठवड्यात सादर होणार. मंच सज्ज आहे तुम्ही देखील सज्ज व्हा या सुरेल मैफिलीसाठी. 


रसिका सुनील करणार सूत्रसंचालन


महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा'  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले महेश काळे (Mahesh Kale) तसेच हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. उत्तमातून उत्तर सूर शोधण्याचा हा ध्यास सुरू होत आहे 7 ऑक्टोबरपासून शनि - रवि रात्री 9 वाजता. 


जुनी गाणी नव्या रुपात सजणार 


'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण पर्वात जुनी गाणी नव्या रुपात सजणार आहेत. प्रत्येक गाण्याला नाविन्याची किनार असणार आहे आणि ही जबाबदारी मोठ्या उत्साहाने पार पडणार आहे आजची महाराष्ट्राची तरुण पिढी. कारण तरुण पिढीकडे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यांच्यात एक जिद्द असते, एक प्रकारची वेगळी ऊर्जा असते काहीतरी वेगळं करून दाखविण्याची. कार्यक्रमाच्या ऑडिशनला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून निवडलेल्या 12 सूरवीरांमध्ये रंगणार आहे सामना. कोण ठरणार महविजेता ? कोणाला मिळणार मानाची कट्यार हे कळेलच.


संबंधित बातम्या


Sur Nava Dhyas Nava Show: स्पृहा जोशीच्या ऐवजी आता ‘ही’ अभिनेत्री करणार ‘सूर नवा ध्यास नवा’ चं सूत्रसंचालन; नेटकरी नाराज, म्हणाले...