एक्स्प्लोर

Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला 

सिने कलाकार सयाजी शिंदेवर (Sayaji Shinde) मधमाशांचा हल्ला झाला आहे.

Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर मधमाशांचा हल्ला (Honeybee Attack) झाला आहे. सयाजी शिंदे यांनी पुणे बंगळुरु (Pune-Bangalore Highway) महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करत होते. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला.

पुणे बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्यामुळे तेथील झाडे वाचवण्यासाठी ते तासवडे येथे स्वतः उपस्थित होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं. सयाजी शिंदे यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, ते सुखरुप आहेत. या घटनेत सयाजी शिंदे यांना दुखापत झालेली नाही. 

सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड

अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड केली आहे. सयाजी शिंदे हे लोकांना झाडे लावण्याचा संदेश देतात. अभिनेते सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी काही वर्षांपूर्वी एका उपक्रमाची घोषणा केली होती. राज्यभरातील जी काही खुप जुनी झाडे आहेत, त्यांची माहिती एकत्र करण्यासाठी सह्याद्री देवराईकडून दोन मोबाईल नंबर देण्यात आले.  त्या नंबरवर आपला जुन्या झाडासोबतचा झाडाला मिठी मारलेला फोटो आणि ते झाड किती वर्षे जुनं आहे, ते कुठे आहे, ही माहिती लिहून व्हॉट्सॲप करायची होती. त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 

बुलढाण्यात लग्न वऱ्हाडावर मधमाशांचा हल्ला

तर काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील दुसरबिड इथे लग्न वऱ्हाडावर मधमाशांनी हल्ला केला होता. 1 मार्च रोजी सायंकाळी लग्न समारंभाच्या वेळी नवरदेव घोड्यावरुन लग्नस्थळी जात असताना डीजेच्या आवाजामुळे झाडावरील मधमाशांनी या लग्नातील वऱ्हाडी मंडळीवर अचानक हल्ला केला. यानंतर घोड्यासह नवरदेव धावत सुटला तर वऱ्हाड मंडळी, बँडवाले, लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ शूटिंग करणारा फोटोग्राफरसह सर्वच जण आपला जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळत सुटले. यावेळी जवळपास 250 वऱ्हाड्यांना मधमाशांनी चावा घेतला तर नवरदेवाला तात्काळ जवळच्या एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. सर्व वऱ्हाडी मंडळींवर उपचार करण्यात आले.

सयाजी शिंदे यांचे आगामी चित्रपट

सयाजी शिंदे हे 'घर, बंदूक, बिरयानी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  सयाजी शिंदे यांच्यासोबतच नागराज मंजुळे, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे. सयाजी शिंदे यांच्या या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

स्वातंत्र्यदिनी 'हर घर तिरंगा' लावाच, पण प्रत्येक गावात 75 झाडं लावा; सयाजी शिंदे आणि भालचंद्र नेमाडे यांचे आवाहन

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection: 45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
Toxic Actor Yash On Ramayana 4000 Crore Budget: स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
Actress Hayden Panettiere Passes Away: वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget