Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


Karan Gunhyala Mafi Nahi : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत आस्ताद काळेची एन्ट्री; आता दिसणार नेत्याच्या भूमिकेत


Karan Gunhyala Mafi Nahi : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' (Karan Gunhyala Mafi Nahi) ही नवी थरारक मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्याची झलक प्रेक्षकांना आवडली आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत. आता या मालिकेत आस्ताद काळेची (Astad Kale) एन्ट्री होणार आहे. 


  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tuzech Mi Geet Gaat Aahe:  मल्हारने स्वराजसाठी तुळशीजवळ लावला दिवा; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल


Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेमध्ये सध्या सगळ्यांना स्वराज उर्फ स्वराची चिंता होत आहे. स्वराज अजून शुद्धीवर आलेला नाही. त्यामुळे मल्हारला चिंता होत आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये स्वराज, मल्हार आणि क्षमा हे दिसत आहेत. 


  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


The Kapil Sharma Show :  'द कपिल शर्मा शो'मध्ये सुधा मुर्ती, रवीना टंडन आणि गुनीत मोंगा यांनी लावली हजेरी; सांगितले मजेशीर किस्से


The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात.  शोमधील कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. नुकताच 'द कपिल शर्मा शो' चा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये रवीना टंडन (Raveena Tandon),  गुनीत मोंगा (Guneet Monga) आणि सुधा मुर्ती (Sudha Murty) या दिसत आहेत. 


  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट; कार्तिकला धडा शिकवण्यासाठी दीपा सज्ज


Rang Maza Vegla Marathi Serial Latest Update : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील नव्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. दीपा आता कार्तिकला धडा शिकवणार आहे. 


'रंग माझा वेगळा' या मालिकेने अप्लावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दीपा आणि कार्तिकची लव्हस्टोरी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. दीपाने सौंदर्याचा बदललेला दृष्टिकोन प्रेक्षकांनादेखील भावला. पण नंतर ही मालिका रटाळ झाली आणि या मालिकेने चौदा वर्षांची लीप घेतली. 


  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत आशुतोषच्या बहिणीची अखेर एन्ट्री होणार; वीणाच्या भूमिकेत दिसणार खुशबू तावडे


Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत चालली आहे. सध्या या मालिकेत इशाची लगीनघाई सुरू असून लवकरच तिला साखरपुडा होणार आहे. दरम्यान मालिकेत आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. 


  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा