The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात.  शोमधील कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. नुकताच 'द कपिल शर्मा शो' चा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये रवीना टंडन (Raveena Tandon),  गुनीत मोंगा (Guneet Monga) आणि सुधा मुर्ती (Sudha Murty) या दिसत आहेत. 


'द कपिल शर्मा शो'मध्ये रवीना टंडन, गुनीत मोंगा आणि सुधा मुर्ती यांनी हजेरी लावली. हा एपिसोड या वीकेंडला प्रेक्षकांना बघता येणार आहे. 'द कपिल शर्मा शो' च्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, रवीना टंडन आणि सुधा मुर्ती  या मजेशीर किस्से सांगत आहेत. प्रोमोमध्ये दिसत आहे की रवीना ही तिच्या अंदाज अपना अपना या चित्रपटामधील लूकबाबत सांगत आहे. सुधा मुर्ती देखील एक किस्सा सांगाताना दिसत आहेत. 






23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली.  कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. जून महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार आहे, असं म्हटलं जात होतं. आता 'हा शो खरच बंद होणार आहे का?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये कपिलला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत कपिल म्हणाला, 'हे अजून निश्चित झालेले नाही. आम्हाला जुलैमध्ये टूरसाठी यूएसएला जायचे आहे आणि नंतर आम्ही याबबात विचार करु. अजून बराच वेळ आहे.'


'द कपिल शर्मा' च्या रवीना टंडन, गुनीत मोंगा आणि सुधा मुर्ती  यांच्या एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. रवीनाने 1991 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रवीनानं केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2)  या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.   आता रवीना ही केजीएफ-3 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. रवीनाच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या


The Kapil Sharma Show :  ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार? कपिल शर्मा म्हणाला...