Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे.  लवकरच ईशा बोहल्यावर चढणार आहे. ईशाच्या साखरपुड्याच्या शॉपिंगला सुरुवात झाली आहे. 


आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ईशा, अनिशची आई,  कांचनताई, सुलेखाताई आणि अरुंधती या सगळ्या ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी एका साडीच्या दुकानात गेल्या आहेत. या दुकानात ईशाला एक घागरा आवडतो. या घागऱ्याची किंमत 35 हजार आहे. हे ऐकून कांचनताई आणि अरुंधती आश्चर्यचकित होतात. ईशाला ते घागरा घालून बघायचा असतो. ईशा तो घागरा घालून पाहते तेव्हा तिला तो खूप आवडतो. पण त्या घागऱ्याची किंमत जास्त असल्यानं अरुंधती आणि कांचनताई यांचे मत असते की, ईशानं दुसरं काही तरी खरेदी करावं. 


पाहा प्रोमो






आई कुठे काय करते या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की,  ईशा म्हणते, 'अनिशच्या आईनं माझ्यासाठी खरेदी केली, पैशाच्या आजिबात विचार केला नाही आणि आपण अनिशला साधा सुती कुर्ता घेतला.' यावर ईशाला अरुंधती म्हणते, 'जेवढं करायला पाहिजे तेवढं करतोय आपण.'


अरुंधतीच्या मते, ईशा आणि अनिशचा साखरपूडा हा घरच्या घरीच व्हावा. तर दुसरीकडे ईशाचं म्हणणं आहे की, तिला साखपुडा हा धुमधडाक्यात करायचा आहे. यावरून  आणि अरुंधतीमध्ये वाद झाला होता. 






'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात. तर  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.   


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aai Kuthe Kay Karte: ईशाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात, पण देशमुखांच्या घरी वाद; 'हे' आहे कारण