Sudipto Sen The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून अनेक सिनेमांवर टीका होत आहे. पण वादाच्या भोवऱ्यात अडकलेले हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र यशस्वी होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुदीप्तो सेनने (Sudipto Sen) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
सुदीप्तो सेनबद्दल जाणून घ्या... (Who Is Sudipto Sen)
सुदीप्तो सेनचा जन्म पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमध्ये झाला आहे. तेथीलच एका शाळेत त्याने शिक्षण घेतले. त्यानंतर कोलकाता येथील बीटी रोडवरील सरकारी शाळेत पुढील शिक्षण घेतले. कोलकाता येथील विश्वविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
माहितीपट ते रुपेरी पडदा गाजवणारे सुदीप्तो सेन!
सुदीप्तो सेनने (Sudipto Sen) 1997 साली 'द अदर वेल्थ' या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. त्यानंतर 'लॅन्ड विथ रिपल्स' या माहितीपटाचं दिग्दर्शन केलं. 1998 ते 2002 या काळात सुदीप्तो सेनने विश्व बॅंकमध्ये निर्माता म्हणून काम केलं. 2006 साली त्याने 'द लास्ट मॉन्क' या इंग्रजी सिनेमाचं दिग्दर्शन केलं. त्यानंतर 'एंथिपोवोवेट्टम' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मल्याळम सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
सुदीप्तो सेनने अनेक हिंदी सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'लखनऊ टाइम्स' (2015), 'आसमा' (2018), 'गुरु जी: अहेड ऑफ टाइम' (2018), 'गुरुजन' (2022) आणि 'द केरळ स्टोरी' (2023) या हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं आहे.
सुदीप्तो सेन (Sudipto Sen) हे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते सिनेसृष्टीत कार्यरत असले तरी लोकप्रियतेत मात्र ते मागे पडले होते. पण 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाने त्यांना रातोरात स्टार बनवलं आहे. या सिनेमामुळे ते लोकप्रिय झाले आहेत. 'द केरळ स्टोरी' या सिनेमानंतर त्यांना अनेक चांगल्या सिनेमांच्या ऑफर मिळू लागल्या आहेत. त्यांच्या 'द केरळ स्टोरी' या सिनेमाला विरोध होत असला तरी काही मंडळी मात्र त्यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक करत आहेत.
संबंधित बातम्या