Tuzech Mi Geet Gaat Aahe:

  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेमध्ये सध्या सगळ्यांना स्वराज उर्फ स्वराची चिंता होत आहे. स्वराज अजून शुद्धीवर आलेला नाही. त्यामुळे मल्हारला चिंता होत आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये स्वराज, मल्हार आणि क्षमा हे दिसत आहेत. 


तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेच्या प्रोमोमध्ये मल्हार हा स्वराजबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे. अशातच क्षमा ही मल्हारला तुळशीच्या जवळ दिवा लावाला सांगते. मल्हार हा तुळशीच्या जवळ दिवा लावायला जातो, तेव्हा मंजुळा ही त्याला चोरुन बघत असते. तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता स्वराज हा शुद्धीवर  येईल का? हे प्रेक्षकांना तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये समजेल. 


काही दिवसांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही वैदेही सारखी दिसते.  स्वराज आणि मंजुळा यांना काही गुंडांनी पकडले होते. त्यावेळी निरंजन आणि मल्हार हे स्वराजला वाचवायला गेले होते.


पाहा प्रोमो: 






'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील कलाकार


 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत (Tuzech Mi Geet Gaat Aahe)   मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर  हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते. या मालिकेतील  मंजुळा ही भूमिका देखील ऊर्मिला कानेटकर साकारते.  'तुझेच मी गीत गात आहे’  या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tuzech Mi Geet Gaat Aahe: निरंजनने क्षमा,विजय आणि आजीला सांगितलं वैदही सारख्या दिसणाऱ्या बाईविषयी; पाहा 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो