Karan Gunhyala Mafi Nahi Marathi Serial Latest Update : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' (Karan Gunhyala Mafi Nahi) ही थरारक मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ACP अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सोबतच  रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे. 


'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेत काय पाहायला मिळणार? 


सध्याचे तरुण एका वेगळ्याच जाळ्यात अडकले आहेत. ते जाळं आहे ऑनलाईन गेमिंगचं. नकळत या जाळ्यात सगळे गुंतले जात आहेत. झटपट पैसे जिंकण्याच्या आशेने या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात सगळे अडकत आहेत. त्यातून होणार्‍या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्यांना आणखीन मोठ्या गुन्ह्यांच्या आहारी जावं लागतं आहे. यातून चोरी, सिरियल किलिंग या गुन्ह्याचे प्रमाणही वाढतं आहे. 


महाराष्ट्र पोलीस दलात त्यासाठीच 'स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड' नेमण्यात आलं आहे. त्याचा भाग इन्स्पेक्टर भोसले, जमदाडे आणि ACP अनुजा असणार आहेत. ते कशा प्रकारे या गुन्ह्याला आवरण्याचा आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा प्रयत्न करतील, हे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 




'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेत वेगवेगळे सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे हरीश दुधाडे इन्स्पेक्टर भोसलेच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. चंद्रलेखा जोशीने आपल्या अभिनायाच्या जोरावर जमदाडे ही व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचवली. त्याबरोबरच पोलिसांच्या आयुष्यातील दुसरी बाजूही प्रेक्षकांना या मालिकेतून पाहता येणार आहे. 


पोलीस आपल्या कामात नेहमी तत्पर असतात. दिवस-रात्र आपल्या कामाला महत्त्व देतात. आपल्या कुटुंबाला देण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतो. ते आपल्या कामाला नेहमी प्राधान्य देतात. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेच्या माध्यमातून नेहमी आपल्या कामात तत्पर असलेल्या पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींवरही भाष्य केले जाणार आहे. 


'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेचं लेखन चिन्मय मांडलेकरने केलं आहे. तर भीमराव मुडेने या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या मालिकेची निर्मिती मनवा नाईकने केली आहे. आजपासून ही मालिका प्रेक्षक सोनी मराठीवर 1 मेपासून रात्री 10.30 वाजता पाहू शकतात. 


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte: साखरपुडा साध्या पद्धतीने करायला ईशा तयार होणार? अरुंधतीनं केला समजावण्याचा प्रयत्न