Shah Rukh Khan Tweet : 'तू माझा क्रश', वृद्ध महिलेचे 'किंग खान'ला ट्वीट; शाहरुखच्या उत्तराने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Shah Rukh Khan Tweet : एका वृद्ध महिलेने शाहरुख खानला तिचा क्रश असल्याचं सांगितलं आहे. यावर किंग खानने जे उत्तर दिलं आहे त्याने सर्वांची मने जिंकली आहेत.

Shah Rukh Khan Tweet : बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते फक्त देशातच नाही तर जगभरात आहेत. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण शाहरूखचा चाहता आहे. शाहरूख खान सोशल मीडियावर अनेकदा आपल्या चाहत्यांवर प्रेमाचा वर्षाव करत असतो. आता एका वृद्ध महिलेने शाहरुख खानला तिचं क्रश म्हटलं आहे. यावर शाहरूखने जे उत्तर दिलं आहे ते जाणून घेतल्यानंतर तुम्हीदेखील त्याच्या आणखी प्रेमात पडाल.
वृद्ध महिलेनं शाहरुखला म्हटलं आपलं क्रश
Huṁ paṇa tanē prēma karuṁ chuṁ Baa. https://t.co/nZLzYhafFl
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 22, 2023
एका यूजरने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती एका वृद्ध महिलेला गुजराती भाषेमध्ये विचारताना दिसतोय, की, बा, तुझा क्रश कोण आहे? यावर उत्तर देताना ती महिला धर्मेंद्र आणि शाहरुख खानचं नाव घेते. यावर ती व्यक्ती विचारते, 'रणबीर कपूर की रणवीर सिंग?' उत्तरात ती नाही म्हणते. या वृद्ध महिलेचं म्हणणं आहे की, शाहरुख खान चांगला अभिनय करतो आणि तोच तिचा क्रश आहे.
शाहरूखनंही दिला खास रिप्लाय
हा व्हिडीओ शेअर करताना संबंधित व्यक्तीने शाहरुख खानला टॅग केले आहे. यावर किंग खाननेदेखील गुजराती भाषेत ट्वीट केले आहे. ज्याचा हिंदीत अर्थ आहे 'मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो बा'. शाहरुख खानच्या या प्रतिक्रियेवर चाहत्यांकडून भरपूर कमेंट्स येत आहेत आणि 'हाच खरा बादशाह' म्हणून शाहरूखवर प्रेम दाखवतायत.
'पठाण' चित्रपटाने अनेक कोटींची कमाई केली
शाहरुख खानसाठी आजचा दिवस खूप खास आहे कारण त्याच्या पठाण चित्रपटाच्या हिंदी भाषेत 500 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याच वेळी, तमिळ आणि तेलुगू भाषेसह 'पठाण'ने देशभरात 518.06 कोटींची कमाई केली आहे. शाहरुखचा पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे. पठाण चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham) आणि आशुतोष राणा (Aashutosh Rana) यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद असून त्यांनी यापूर्वी 'वॉर' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Pathaan Box Office Collection: तिकीट दर कमी केल्याचा 'पठाण'ला फायदा? काय सांगते आकडेवारी? जाणून घ्या























