Lavanya Tripathi : कोण आहे वरुण तेजची होणारी पत्नी लावण्या त्रिपाठी? जाणून घ्या चिरंजीवीच्या सुनेबद्दल...
Lavanya Tripathi Varun tej : वरुण तेजचा नुकताच गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठीसोबत साखरपुडा झाला आहे.
Lavanya Tripathi Varun tej : दाक्षिणात्य अभिनेता वरुण तेजचा (Varun Tej) नुकताच गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठीसोबत (Lavanya Tripathi) थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. साखरपुड्यातील एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत वरुण आणि लावण्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लावण्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
लावण्या त्रिपाठी कोण आहे? (Who Is Lavanya Tripathi)
लावण्या त्रिपाठीचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्येत झाला. उत्तराखंडातील देहरादूनमध्ये तिचं शालेय शिक्षण झालं. तिचे वडील वकील असून आई शिक्षिका आहे. देहरादून येथील मार्शल शाळेत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती मुंबईत आली. मुंबईतील ऋषी दयाराम नॅशनल महाविद्यालयातून तिने अर्थशास्त्र विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं.शिक्षण घेत असतानाच लावण्याला अभिनयाची गोडी लागली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. काही जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तिने मालिकाविश्वात पदार्पण केलं.
लावण्याचा सिनेप्रवास जाणून घ्या...
लावण्या त्रिपाठी सिने-अभिनेत्री, मॉडेल आणि नृत्यांगना आहे. तेलुगू सिनेसृष्टीत लावण्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मॉडेल म्हणून लोकप्रिय असलेल्या लावण्याच्या नावावर 2006 सालचा 'मिस उत्तराखंड'चा किताब आहे. 2012 साली 'अंडला राक्षसी नाम' या सिनेमाच्या माध्यमातून लावण्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमातील तिचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. त्यानंतर तिने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
लावण्याने 2009 साली 'प्यारे के बंधन' या मालिकेच्या माध्यमातून मालिकाविश्वात पदार्पण केलं. तर 2012 साली 'अंडला राक्षसी' या सिनेमाच्या माध्यमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. दोसुकेल्था (2013), 'ब्रम्मान' (2014), 'भाले भाले मगदिवोय' (2015), 'सोगदे चिन्नी नयना' (2016) या दाक्षिणात्य सिनेमांत लावण्याने काम केलं आहे. तसेच 2023 मध्ये आलेल्या 'पुली मेका' या सीरिजच्या माध्यमातून तिने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे.
2016 मध्ये मला माझं प्रेम मिळालं : वण्या त्रिपाठी
लावण्या त्रिपाठीने वरुण तेजसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना साखरपुड्याची बातमी दिली आहे. तिने लिहिलं आहे,"2016 मध्ये मला माझं प्रेम मिळालं". तिच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तसेच तिच्या या पोस्टने लावण्या आणि वरुण तेज 2016 पासून एकमेकांना डेट करत आहेत हे स्पष्ट झालं आहे. आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता त्यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे. लावण्या आणि वरुण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
View this post on Instagram
संबंधित बातम्या