Moonfall : एखाद्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आला तर? पण हे खरोखर शक्य आहे का? हॉलिवूडमध्ये अशा विषयांवर अनेक सिनेमे बनले आहेत. पण आता याच विषयावर भाष्य करणारा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. 'मूनफॉल' सिनेमा 11 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रोलँड एमेरिच यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा सायन्स फिक्शन असणार आहे. रोलँड एमेरिच यांनी आतापर्यंत 'स्वतंत्रता दिवस', 'द डे आफ्टर टुमॉरो', '10,000 बीसी' सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. 'मूनफॉल' सिनेमात अंतराळवीर आणि शास्त्रज्ञांवर केंद्रित केले आहे. पृथ्वीला एका मोठ्या आपत्तीपासून वाचवणे असे या सिनेमाचे कथानक आहे.
'मूनफॉल' सिनेमात अनेक रोमांचक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. 'मूनफॉल' सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच हा सायन्स फिक्शन सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आता या सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे.
संबंधित बातम्या
Urmila Matondkar : शाहरूख थुंकला नाहीच, ट्रोल करणाऱ्यांना भान नाही; उर्मिला मातोंडकरांचा संताप
Upcoming Movies : गंगूबाई काठियावाडी, गेहराईंया अन् बधाई दो; 'या' धमाकेदार चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी
Lata Mangeshkar : बचपन के दिन भी क्या दिन थे...; लता दीदींच्या आठवणीत रमल्या आशाताई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha