Kushal Badrike : कुशल बद्रिकेची बायकोसाठी खास पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाला, 'अमेरिकेला जाणार, “मुघम-ए-आझम” मध्ये डान्स करणार...'
कुशलनं (Kushal Badrike) नुकतीच त्याच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Kushal Badrike : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकतो. 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून कुशल प्रेक्षकांच्या भेटीस येतो. कुशल सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळ्या विषयांवर आधारित पोस्ट तो सोशल मीडियावर शेअर करतो. कुशलनं नुकतीच त्याच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
कुशल बद्रिकेनं सोशल मीडियावर पत्नी सुनयना बद्रिकेसोबतचे काही फोटो शेअर केले. फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'यार सुनयना, तू काय बाबा आता “अमेरिकेला” जाणार, “मुघल ए आझम” मध्ये डान्स बिंस करणार, पिझ्झा बर्गर खाणार , झ्याक-प्याक राहणार.. जायचं आहे तर जा, “आमाला काय…. बाबा” खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना “घराला” म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस. बाकी तू परत येशील तेंव्हां…हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, “मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल.'
पुढे पोस्टमध्ये कुशलनं लिहिलं, 'गंमत आहे बघ, कधी काळी, “आपलं सुद्धा एक घर असेल”, अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे आपलं घर” डोळे लाऊन बसेल आणि मी………मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी………. (सुकून) तळ टिप:- तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार आणि मुघलांनी अमेरिके वर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आझम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा.'
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी कुशलचा 'पांडू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामध्ये कुशलसोबतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता भाऊ कदम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :