Kiran Mane: "सेक्समध्ये स्त्रियांच्या लैंगिक सुखालाही समान महत्त्व..."; किरण मानेंनी शेअर केली 'थँक्यू फॉर कमिंग' चित्रपटाबद्दल खास पोस्ट
अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच थँक्यू फॉर कमिंग (Thank You For Coming) या चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Kiran Mane: 'थँक्यू यू फॉर कमिंग' (Thank You For Coming) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी काही प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. भूमी पेडणेकर, शहनाज गिल, कुशा कपिला या अभिनेत्रींनी या चित्रपटात काम केलं आहे. अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
किरण माने यांची पोस्ट
किरण माने यांनी थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टला त्यांनी कॅप्शन दिलं, "मागच्या आठवड्यात एका सिनेमाचं कौतुक करताना एका जाणकार समीक्षकानं लिहिलं होतं, 'क्लायमॅक्स फसलाय, पण सिनेमा छान आहे!' वाचून म्हणलं,"च्यायला हे कसं शक्य आहे?" 'क्लायमॅक्स' फसणारी कुठलीबी गोष्ट चांगली कशी असू शकते? उत्तम क्लायमॅक्ससाठी तर आयुष्यात सगळा झगडा सुरू असतो आपला.असो. तर अशा एका अति महत्त्वाच्या 'क्लायमॅक्स' बद्दल बिनधास्त बोलणारा भन्नाट चित्रपट परवा बघितला.'थँक यू फॉर कमिंग! सेक्समध्ये स्त्रियांना हव्या असणार्या 'ऑरगॅजम'बद्दल मनोरंजनातून काहीतरी सांगू पहाणारा असा भारतीय 'मेन स्ट्रीम' सिनेमा आजपर्यंत मी तरी पाहिला नव्हता."
पुढे किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "पाचसहा वर्षांपूर्वी कंडोम बनवणाऱ्या एका कंपनीनं रिसर्चनुसार, आपल्याकडे सत्तर टक्के महिलांना सेक्स दरम्यान ऑरगॅजम मिळतच नाही आणि नव्वद टक्के पुरूष सेक्सदरम्यान स्त्रियांना काय हवंय याचा विचारच करत नाहीत ! खरंतर याच आपल्या भारत देशानं हजारो वर्षांपूर्वी वात्स्यायन नावाचा खराखुरा फेमिनिस्ट विचारवंत दिला. ज्यानं 'कामसूत्र' ग्रंथात लिहीलंय की, 'सेक्समध्ये स्त्रियांच्या लैंगिक सुखालाही समान महत्त्व आहे. उत्तम सेक्स तोच असतो ज्यात स्त्री आणि पुरुष दोघेही एकत्र तृप्तीच्या चरमसीमेपर्यंत अर्थात क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतात.या विषयी 'जाणीव' झालेल्या आजच्या काळातल्या एका तरूणीची गंमतीशीर कथा 'थँक्यू यू फॉर कमिंग'मध्ये सांगितली आहे. 'ऑरगॅजम' पर्यंत पोचवणारा पुरूषच नवरा म्हणून पाहिजे ही तिची इच्छा. सेक्सकडे केवळ दोन चार मिनिटांचा खेळ म्हणून बघणार्या पुरुषांच्या जगात तिचा हा प्रवास खूप अनपेक्षित धक्के देत, वळणं घेत, अतिशय इन्टेन्स अशा शेवटाकडे. तिला हव्या असलेल्या क्लायमॅक्सकडे आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणार्या 'चरमसीमे'कडे घेऊन जातो ! सिनेमात काही लॉजिकल चुका आहेत. उथळ वाटेल असा फेमिनिजम आहे. पण एक मात्र खरं की, स्त्रियांविषयी जी गोष्ट उघडपणे बोलली जात नाही, चारभिंतीतही विषय नसतो. तिला ग्लॅमरस कमर्शियल सेक्स कॉमेडी सिनेमाच्या माध्यमातनं का होईना वाचा फोडली गेली. असा सिनेमा लिहिल्याबद्दल राधिका आनंद - प्रशस्ती सिंग या लेखिकांच्या जोडीला सलाम केला पाहिजे. पुरूषांसाठी स्त्रिचा 'जी पॉईंट' शोधणं जितकं कठीण, तितकंच स्त्रिसाठी त्या गोष्टीचं महत्त्व एक्सप्लेन करणं अवघड. ते काम या दोघींनी अतिशय सहजपणे केलंय. एका हटके विषयाची छान रोलर कोस्टर राईड हवी असेल तर नक्की बघा...'थँक्यू यू फॉर कमिंग'!"
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या:
Thank You For Coming : भूमी पेडणेकरचा 'थँक्यू फॉर कमिंग' कसा आहे? जाणून घ्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
