Kili Paul : 'परदेसिया' गाण्यावर थिरकला किली पॉल; व्हिडीओ व्हायरल
टांझानियाचा (Tanzania) किली पॉल (kili paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच त्यानं 'परदेसिया' या 90 च्या दशकातील प्रसिद्ध गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Kili Paul : सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इन्टाग्रामवरील रिल्स नेटकऱ्यांना बघायला आवडतात. वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरील डान्सचे रिल्स सध्या अनेक लोक सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. टांझानियाचा (Tanzania) किली पॉल (Kili Paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. किली पॉल हा जरी टांझानियामध्ये राहात असला, तरी बॉलिवूडवर त्याचं विशेष प्रेम असल्याचं पाहायला मिळतं. तो नेहमीच बॉलिवूडच्या गाण्यांवर रिल्स तयार करत असतो. नुकताच त्यानं 'परदेसिया' या 90 च्या दशकातील प्रसिद्ध गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
किली पॉलनं 'परदेसिया' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'डान्स आणि या गाण्याची वाइब मस्त आहे' किलीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉलची बहीण नीमा पॉल ही देखील दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती
किलीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 99 हजारपेक्षा जास्त युझर्सनं या व्हिडीओला लाइक केलं असून 946K नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. किली पॉल हा हिंदी गाण्यांबरोबरच मराठी आणि भोजपुरी गाण्यांवरील व्हिडीओ देखील शेअर करतो. तो बॉलिवूड, साऊथ या चित्रपटांमधील गाण्यांवर थिरकताना अनेकदा दिसतो.
बिजली बिजली, टिप टिप बरसा पानी आणि कूसू कूसू या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओ किलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 4.7 मिलियनपेक्षा जास्त नेटकरी किली पॉलला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. विविध डायलॉगवरील लिप्सींगचे व्हिडीओ किली सोशल मीडियावर शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी किली पॉलनं झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या मंचावर देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये किलीनं नोरा फतेहीसोबत डान्स देखील केला.
पाहा किली आणि नोराच्या डान्सचा व्हिडीओ
View this post on Instagram
महत्वाच्या इतर बातम्या :