एक्स्प्लोर
उद्ध्वस्त केरळला सनी लिओनीचा मदतीचा हात
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, चित्रपट निर्माते प्रियदर्शन, शाहरुख खान हेदेखील मदतीसाठी समोर आले आहेत.
![उद्ध्वस्त केरळला सनी लिओनीचा मदतीचा हात Kerala floods : Did Sunny Leone donated 5 crore to Kerala relief fund उद्ध्वस्त केरळला सनी लिओनीचा मदतीचा हात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/20161228/Sunny-Leone.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये कायम चर्चेत असते. यावेळीही ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण एका चांगल्या कामामुळे. पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळच्या मदतीसाठी सनी लिओनीने मदतीचा हात पुढे केला आहे. सनीने केरळ पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांची देणगी दिल्याचं म्हटलं जात आहे.
केरळमध्ये उद्भवलेली परिस्थिती आणि त्याचा नागरिकांवर झालेला परिणाम, यामुळे सनी फारच चिंतेत आहे. त्यामुळेच तिने मदत केली आहे. सनी लिओनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. परंतु या वृत्ताला सनीने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
याबाबत विचारलं असता सनीच्या टीमने सांगितलं की, "सनीला याबाबत काहीही बोलायचं नाही आणि तिने किती रुपयांची मदत केली हे देखील तिला सांगायचं नाही. ही अतिशय खासगी बाब आहे आणि तिची प्रर्थना केरळच्या लोकांसोबत आहे. सनी लिओनीच्या या कृत्यामुळे तिचे चाहते फार खूश आहेत."
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, चित्रपट निर्माते प्रियदर्शन, शाहरुख खान हेदेखील मदतीसाठी समोर आले आहेत. तर तामीळ सुपरस्टार विक्रम, तेलुगू सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर, नंदकुमारी कल्याण यांनीही मुख्यमंत्री सहाय्यता फंडला मदत दिली आहे.
पावसाची उसंत, मात्र 370 मृत्यूमुखी
केरळमध्ये पावसाने उसंत घेतल्याने, हळूहळू पूर ओसरु लागला आहे. पण पूर ओसरल्यानंतरच्या नुकसानाची दाहकता महाभयंकर आहे. पुरात आतापर्यंत 370 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 7 लाख 24 हजार 649 जणांना पुनर्वसन शिबीरात हलवण्यात आलं आहे. पूरग्रस्तांसाठी केरळमध्ये 5,645 मदत आणि पुनर्वसन केंद्र उभारली आहेत.
प्रशासनाने 14 जिल्ह्यांत दिलेला रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. दरम्यान केंद्राची परवानगी मिळवल्यानंतर आजपासून कोच्चीच्या नेवी बेसवरुन पॅसेंजर फ्लाईट उड्डाण घेऊ शकणार आहेत. 26 ऑगस्टपर्यंत कोच्ची एअरपोर्ट बंद ठेवण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)