कौन बनेगा करोडपती 13 ला मिळाला दुसरा करोडपती! 7 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्पर्धक तयार
Kaun Banega Crorepati 13 Show: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी होस्ट केलेल्या कौन बनेगा करोडपतीला आणखी एक करोडपती मिळाला आहे.
Kaun Banega Crorepati 13 Contestants: कौन बनेगा करोडपती 13 (Kaun Banega Crorepati 13) हा प्रसिद्ध शो सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. यातील प्रत्येक भाग मनोरंजनांनी भरलेला आहे. यासोबतच अनेक स्पर्धक या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी होस्ट केलेल्या कौन बनेगा करोडपतीला आणखी एक करोडपती मिळाला आहे.
होय, तुम्ही बरोबर वाचले. शोच्या निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो शेअर केला आणि त्यात बिग बींनी या सीझनच्या दुसऱ्या करोडपतीची घोषणा केल्याचे दिसून येते. स्पर्धकाचे नाव अद्याप उघड झालेले नाही. हा स्पर्धक 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची तयारी करत असल्याचे दिसते.
View this post on Instagram
प्रोमोमध्ये होस्ट असलेले अमिताभ बच्चन स्पर्धकाशी बोलताना दिसत आहेत. बिग बी स्पर्धकाला प्रश्नाचे सर्व पर्याय दाखवतात तर स्पर्धक कोणते उत्तर बरोबर आहे हे शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. यावर विचार केल्यानंतर, त्याने पर्याय D बरोबर जाण्याचे ठरवले आणि दुसऱ्याच क्षणी आपण बिग बी त्यांच्या शैलीत 'एक कोटी' म्हणताना पहायला मिळतात. प्रोमोमध्ये पाहिल्यानुसार स्पर्धकाच्या आनंदाला पारावर उरलेला दिसत नाही.
प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकाला आठवण करून देतात की खेळ अजून संपलेला नसून ते 7 कोटींच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तयार आहे. प्रोमो शेअर करण्याबरोबरच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, की 'केबीसी 13 च्या मंचावर पुन्हा एकदा तो क्षण येणार आहे, जेव्हा एक स्पर्धक 7 कोटींचा प्रश्न खेळणार. पण, बरोबर उत्तर देऊन तो 7 कोटी जिंकेल का? कौन बनेगा करोडपती, सोम-शुक्र रात्री 9 वाजता फक्त सोनीवर. आतापर्यंत आग्रा येथील हिमानी बुंदेला नावाची स्पर्धक 1 कोटी रुपयांसह शोमधून बाहेर येणारी पहिली स्पर्धक बनली आहे. हिमानी ही एक अंध स्पर्धक होती, तिचा 2011 मध्ये अपघात झाला होता.