Katrina Kaif Vicky Kaushal Marriage : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नानंतर थेट हनिमूनला जाऊ शकतात. 


विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांचे हनिमून डेस्टिनेशन फायनल केले आहे. लग्नानंतर विकी आणि कतरिना पहिल्यांदा मुंबईला रवाना होणार आहेत. त्यानंतर ते हनीमूनला मालदीवला जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


कतरिना आणि विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. कतरिनाच्या हातावर विकी कौशलच्या नावाची मेहंदी रचली जाणार आहे. विकी-कतरिनाने शेवटच्या क्षणापर्यंत लग्नाचे गुपित ठेवले होते. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. बरवाडा किल्ल्याला खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.



लग्नातील फुटेजसाठी विकी-कतरिनाला तब्बल 100 कोटींची ऑफर
लग्नाच्या फुटेजसाठी विकी-कतरिनाला तब्बल 100 कोटी रुपयांची ऑफर ओटीटीकडून देण्यात आली आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मला लग्नातील फोटो आणि व्हिडीओ स्ट्रीम करायचं आहे. त्याबदल्यात विकी-कॅतरिनाला 100 कोटींची ऑफर दिली आहे. दरम्यान, पाश्चात्य देशात सेलेब्रिटी लग्न करत असतील तर फुटेज मॅगझिन अथवा चॅनलला विकतात. अशातच आता भारतातीही हा ट्रेंड सुरु होणार का? याची उत्सुकाता चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.


संबंधित बातम्या


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी-कतरिनाचं Kangana Ranaut ने केलं कौतुक, म्हणाली...


Ankita Lokhande Wedding : नववधू अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत, अंकिता-विकीचं लग्न पुढे ढकलणार का?


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : कतरिना आणि विकीने वेडिंग प्लानिंगसाठी 'या' अभिनेत्रीची केली कॉपी?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha