Katrina Kaif Wedding : विक्की कौशल (Vicky Kaushal)आणि कतरिना कैफ यांच्या (Katrina Kaif) यांच्या लग्नासोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 7 डिसेंबरला संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर 8 डिसेंबरला मेहेंदी आणि 9 डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. विकी आणि कतरिनाने शाही विवाहसोहळ्याआधी कोर्ट मॅरेज केले असल्याचे म्हटले जात आहे. सवाई माधोपूरच्या किल्ल्यामध्ये विकी आणि कतरिनाचा लग्न सोहळा पार पडणार आहे. सध्या अशी चर्चा होत आहे की, विकी आणि कतरिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्या सीक्रेट वेडिंगची आयडिया कॉपी केली आहे.
विरूष्काची सिक्रेट वेडिंग आयडिया
11 डिसेंबर 2017 रोजी विराट-अनुष्काने इटलीत लग्नगाठ बांधली. विरूष्काच्या सिक्रेट वेडिंगचे अनेकांनी त्यावेळी कौतुक केले. आता विराट आणि अनुष्काची सीक्रेट वेडिंग आयडियाचा वापर कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नात करणार आहेत, असं म्हणलं जात आहे.
कतरिना आणि विकीच्या लग्नात 'या' अटींचा समावेश
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही.
संबंधित बातम्या