Dharmendra and Hema Malini Love Story: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र ( Dharmendra ) यांचा आज 86 वा वाढदिवस. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी झाला. धर्मेंद्र यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र ही बॉलिवूडमधील चर्चेत असणारी जोडी आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा देओल (Esha Deol) आणि आहना देओल या दोन मुली आहेत. एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितले होते.
एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी लव्ह-स्टोरीबद्दल सांगितले, 'एका चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान आमची भेट झाली. तेव्हा ते खूप हँडसम आणि फिट दिसत होते. त्यानंतर एका चित्रपटात आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ' काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी 1980 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) ही दोन मुले आहेत. वयाच्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न गाठ बांधली होती.
धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. एका रिपोर्टनुसार धर्मेंद्र हे लवकरच ‘अपने 2’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत सनी, बॉबी ही त्यांची मुलं आणि नातू करण प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
संबंधित बातम्या