Marathi film Ved : 20 वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी सज्ज झाला आहे. रितेश 'वेड' नावाच्या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. 20 वर्ष अभिनय कारकिर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब म्हणजे या सिनेमाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
रितेश देशमुखने ट्विट करत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. रितेशने सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"20 वर्ष कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर आता मी पहिल्यांदाच कॅमेऱ्यामागे उभं राहण्याची मोठी झेप घेतली आहे. माझा पहिला मराठी सिनेमा दिग्दर्शित करत असताना मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवे आहेत. माझ्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा, वेड सिनेमाचा भाग व्हा."
मुंबई फिल्म कंपनीने आज त्यांच्या सहाव्या मराठी सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा अर्थातच 'वेड' आहे. या सिनेमाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या पूर्वी जेनेलियाने हिंदी, तेलगू , तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेनेलिया 'जिया शंकर' या चित्रपटातदेखील मुख्य भूमिकेत आहे. रितेशने 'लय भारी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
संबंधित बातम्या
Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस EDसमोर हजर, दिल्लीतील कार्यालयात झाली चौकशी
Preity Zinta : प्रीती झिंटाने शेअर केला बाळासोबतचा पहिला फोटो
Tejas Release Date: कंगनाचा नवा अवतार! तेजस सिनेमात साकारणार पायलटची भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha