एक्स्प्लोर

कतरिना पाठोपाठ धाकटी बहीण इसाबेलही बॉलिवूडमध्ये!

मुंबई : ब्रिटीश वंशाची अभिनेत्री कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे. कतरिना पाठोपाठ तिची धाकटी बहीणही आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. कतरिनाच्या होम प्रॉडक्शनमधूनच तिची बहीण इसाबेल पदार्पण करण्याची शक्यता आहे. कॅनडियन रोमँटिक कॉमेडी असलेल्या 'डॉ. कॅबी' या चित्रपटातून इसाबेलने चित्रपटात प्रवेश केला. बहिणीचा अभिमान वाटून कतरिनाने 'इसाबेलला बॉलिवूडमध्ये यायचं असेल, तर मी तिची मदत करेन' असं म्हटलं होतं. त्यामुळे बहिणीला दिलेला शब्द कतरिना आता प्रत्यक्षात उतरवणार आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान इसाबेलला लाँच करणार असल्याच्या चर्चा होत्या. इसाबेल कतरिनापेक्षा टॅलेंटेड असल्याचंही त्याने म्हटलं होतं. इसाबेलच्या डेब्यू फिल्मचा सलमान सहनिर्माता असण्याची शक्यता होती. मात्र आता कतरिना तिचीच निर्मिती असलेल्या चित्रपटातून इसाबेलला बॉलिवूडमध्ये आणणार आहे. कतरिनाने मात्र याविषयी मौन बाळगलं आहे. आपल्याला चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरायचं आहे. एक ना एक दिवस आपण चित्रपट काढणार आहोत, मात्र कधी, कोणासोबत हे अद्याप निश्चित नसल्याचं ती सांगते. कतरिनाला तीन मोठ्या बहिणी, तीन धाकट्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. आठ भावंडांच्या गोतावळ्यापैकी इसाबेल आता चित्रपटात झळकणार आहे. आतापर्यंत मोठ्या बहिणीचं बोट धरुन शमिता शेट्टी (शिल्पा शेट्टी), परिणीती चोप्रा (प्रियंका चोप्रा), तनिषा (काजोल) यासारख्या अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यापाठोपाठ कतरिनाची धाकटी बहीणही बॉलिवूडमध्ये नशिब आजमावणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Embed widget