एक्स्प्लोर
कटरीना कैफने खरेदी केली 65 लाखांची कार, सलमानकडून गिफ्ट मिळाल्याची चर्चा
मागील काही दिवसांपासून कतरिना कैफ आणि सलमान खान दुबई दबं टूरसाठी गेले होते. खराब हवामानामुळे ही टूर रद्द झाली आणि त्यांना परतावं लागलं.
मुंबई : दुबई दबंग टूरवरुन परतलेल्या अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये नव्या रेंज रोव्हरचा समावेश केला. सुमारे 50 ते 65 लाख रुपये किंमतीच्या लक्झरी कारच्या नंबरसाठी कतरिना कैफने नोंदणी केली आहे. मात्र सध्या चर्चा अशी आहे की, कतरिनाला ही कार सलमान खानने गिफ्ट म्हणून दिली आहे.
मागील काही दिवसांपासून कतरिना कैफ आणि सलमान खान दुबई दबंग टूरसाठी गेले होते. खराब हवामानामुळे ही टूर रद्द झाली आणि त्यांना परतावं लागलं.
सलमान खानने मागील काही दिवसात चार लक्झरी कार खरेदी केल्या आहेत. प्रत्येक कारची किंमत 50 लाखांच्या जवळपास आहे. यापैकी एक कार स्वत:साठी, दुसरी कार बहिण अर्पितासाठी, तिसरी कार भाऊ अरबाजसाठी आणि चौथी कार कतरिना कैफसाठी खरेदी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कतरिनाने लक्झरी कारचं टॉप मॉडेल निवडलं आहे. तिच्या कलेक्शनमध्ये ऑडी आधीपासूनच आहे.
कतरिना सलमानच्या आगामी 'भारत' चित्रपटात दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाचा निर्माता सलमान खानचा मेहुणा अपूर्व अग्निहोत्री आहे. कतरिना 'भारत'मध्ये काम करण्यास तयार झाल्याने सलमानने तिला ही कार भेट म्हणून दिल्याचं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement