Kartik Aaryan : अक्षय कुमार नव्हे कार्तिक आर्यनला ऑफर झाली होती पानमसाल्याची जाहिरात! अभिनेत्याने धुडकावले तब्बल 15 कोटी
Kartik Aaryan : एका पानमसाल्याच्या जाहिरातीत अक्षयच्या जागी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार होता. मात्र, त्याने ही ऑफर धुडकावून लावली.
Kartik Aaryan : सध्याचा आघाडीचा बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. एकीकडे कार्तिकचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतात, तर दुसरीकडे त्याची ऑफस्क्रीन स्टाईलही चाहत्यांना आवडते. चाहत्यांना भेटणे असो किंवा विमानाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास असो, कार्तिक काहीना ना काही कारणाने चर्चेत राहतो. मात्र, आता कार्तिक एका अशा कारणामुळे चर्चेत आला आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या अभिनेत्याचा अभिमान वाटू लागला आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार एका गुटखा कंपनीच्या जाहिरातीत दिसला होता, तेव्हा त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. या पान मसाला जाहिरातीत तो बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि अजय देवगणसोबत झळकला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जाहिरातीत अक्षयच्या जागी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार होता. मात्र, त्याने ही ऑफर धुडकावून लावली. या पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी कार्तिक आर्यनला तब्बल 15 कोटी रुपयांची ऑफरही देण्यात आली होती. तरीही कार्तिकने या जाहिरातीसाठी स्पष्ट नकार दिला. कार्तिकच्या या निर्णयाचे त्याचे चाहते तोंडभरून कौतुक करत आहेत.
अक्षय कुमारला मागावी लागली होती माफी!
काही काळापूर्वी अक्षय कुमार एका पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसला होता, त्यानंतर तो सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला होता. अक्षयला त्याच्या चाहत्यांनी चांगलेच फटकारले होते. त्यानंतर अक्षय कुमारने चाहत्यांची माफीच मागितली नाही, तर या जाहिरातीतून मिळालेली फी दान करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्याने म्हटले होते. तर, आता त्या जाहिरातीत अक्षय ऐवजी कार्तिक आर्यन झळकणार होता, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. मात्र, कार्तिक आर्यन हा तरुणांचा आवडता कलाकार आहे आणि आता त्याला कोणतीही पान मसाला जाहिरात करून आपली प्रतिमा खराब करायची नाहीय. तसेच, चाहत्यांना कोणताही चुकीचा संदेश द्यायचा नाही, असे म्हणत त्याने ही जाहिरात नाकारली.
साऊथच्या अभिनेत्यांनीही नाकारल्या पानमसाल्याच्या जाहिराती!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनने आपल्या चाहत्यांच्या आरोग्याचा विचार करूनच, अशी जाहिरात करण्यास नकार दिला आहे. यासाठी अभिनेत्याला तब्बल 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. यापूर्वी अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांना पान मसालाच्या जाहिरातींसाठी नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यासाठी अक्षय कुमारला माफीही मागावी लागली होती. तर, साउथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार ‘केजीएफ’ फेम यश (Yash) आणि ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) पण मसाल्यांच्या अशा कोट्यावधींच्या डील नाकारल्या होत्या.
हेही वाचा :
Kartik Aaryan, Aashiqui 3: कार्तिक आर्यनला लागली मोठी लॉटरी! ‘आशिकी 3’मध्ये झळकणार मुख्य भूमिकेत