Shehzada Box Office Collection : शाहरुखच्या 'पठाण'पुढे कार्तिकचा 'शहजादा' पडला फिका; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Shehzada Movie : कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'शहजादा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे.
![Shehzada Box Office Collection : शाहरुखच्या 'पठाण'पुढे कार्तिकचा 'शहजादा' पडला फिका; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन... Kartik Aaryan Kriti Sanon Shehzada movie box office collection know bollywood latest update Shehzada Box Office Collection : शाहरुखच्या 'पठाण'पुढे कार्तिकचा 'शहजादा' पडला फिका; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/ec5922c7a6dc1098c8664f61151a85431676781261217254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kartik Aaryan Shehzada Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'शहजादा' (ShehZada) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. एकीकडे शाहरुखचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे 'शहजादा'ची संथ सुरुवात झालेली आहे.
'शहजादा' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Shehzada Box Office Collection)
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'शहजादा' हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 6 कोटींची कमाई केली आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 7 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीदेखील या सिनेमाला सिनेप्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.
View this post on Instagram
'शहजादा'बद्दल जाणून घ्या...
'शहजादा' हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'अला वैकुण्ठपुरामुलू' (Ala Vaikunthapurramuloo) या दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात कार्तिक आणि कृती मुख्य भूमिकेत असून परेश रावल (Paresh Rawal), मनीषा कोइराला (Manisha Koirala), रोनित रॉय (Ronit Roy) हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर रोहित धवनने (Rohit Dhawan) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कार्तिकनेच या सिनेमाची निर्मितीदेखील केली आहे. 85 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
शाहरुखच्या 'पठाण'चा कार्तिक आर्यनला फटका?
'शहजादा' या सिनेमात कार्तिक आर्यन दुहेरी भूमिकेत आहे. कार्तिक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असण्यासोबत त्याने या सिनेमाची निर्मितीदेखील केली आहे. 'शहजादा' हा बिग बजेट सिनेमा आहे. पण शाहरुखच्या 'पठाण' पुढे कार्तिकचा 'शहजादा' आपली जागा कशी निर्माण करेल आणि बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी होईल का? असे अनेक प्रश्न कार्तिकच्या चाहत्यांना पडले आहेत. 'शहजादा' हा रोमॅंटिक सिनेमा असला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात मात्र कमी पडला आहे. एकीकडे 'पठाण' सारखा सिनेमा असताना 'शहजादा' हा पाहावा असा प्रश्न सिनेरसिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे आता शाहरुखच्या 'पठाण'चा कार्तिक आर्यनला फटका बसणार आहे.
संबंधित बातम्या
Kartik Aaryan: 'शहजादा'ही वाहतूक नियमांचे उल्लंघन करू शकत नाही, मुंबई पोलिसांनी कापले कार्तिक आर्यनचे चलान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)