एक्स्प्लोर
करिश्माच्या दुसऱ्या लग्नाबाबत वडील रणधीर कपूर म्हणतात...
करिश्मा कपूर लवकरच 'बॉयफ्रेण्ड' संदीपसोबत लगीनगाठ बांधणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या, मात्र करिश्माचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी मौन सोडलं आहे.
मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संदीप तोश्नीवाल यांनी आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलणं टाळलं असलं, तरी पार्टी असो वा डिनर डेट अशा अनेक ठिकाणी दोघांनी एकत्र लावलेली हजेरी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
करिश्मा कपूर लवकरच 'बॉयफ्रेण्ड' संदीपसोबत लगीनगाठ बांधणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या, मात्र करिश्माचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी मौन सोडलं आहे.
'करिश्मा आणि संदीप लग्न करत असल्याच्या वृत्तात अजिबात तथ्य नाही. करिश्माने लग्न करावं अशी माझीही इच्छा आहे, मात्र तिलाच त्यात रस नाही. आम्ही याविषयी बोललो आहोत. मात्र आपल्याला पुन्हा संसार थाटण्याची इच्छा नसल्याचं तिने स्पष्टपणे सांगितलं. सध्या तिला समायरा आणि कियान या मुलांचं पालनपोषण करायचं आहे.' असं रणधीर कपूर सांगतात.
'करिश्मा सिंगल वुमन आहे. मी संदीपला ओळखतही नाही. पण तिला कोणाबरोबर फिरावंसं वाटत असेल, तर ती स्वतंत्र आहे. त्यात चूक काय? तो तिचा मित्र आणि एकत्र फिरायला जाण्यात वावगं काहीच नाही' असं रणधीर कपूर यांना वाटतं.
संदीप तोश्नीवाल एका फार्मास्युटिकल कंपनीचा सीईओ आहे. संदीपचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला आहे.
करिश्माने उद्योगपती संजय कपूरसोबत 2003 मध्ये विवाह केला होता. हा संजयचा दुसरा विवाह होता. 2016 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. संजयने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करिश्माने केला होता. 2017 मध्ये संजयने मॉडेल प्रिया सचदेवसोबत लग्नगाठ बांधली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement