एक्स्प्लोर

यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर

मुंबई:  ऐ दिल है मुश्किल या आगामी सिनेमाचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने पाकिस्तानी कलाकारांबाबत अखेर मौन सोडलं आहे. "ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा शूट केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, यापुढे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा करणार नाही", असं करण जोहरने म्हटलं आहे. उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकार असलेले "ऐ दिल है मुश्किल" आणि रईस हे सिनेमे प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला आहे. तसंच पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्यासही सांगितलं होतं.  त्या पार्श्वभूमीवर करण जोहरने आपली पहिली प्रतिक्रिया दिली. "गेल्या काही दिवसांपासून मी शांत का आहे असं विचारलं जात होतं. मात्र मला हेच सांगायचं होतं. देशापेक्षा मोठं काहीही नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान ऐ दिल है मुश्किल सिनेमाचं शूटिंग झालं. मात्र त्यावेळी भारत-पाकिस्तानदरम्यान शांततेसाठी सरकारचे प्रयत्न सुरु होते. शांततेसाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केले. मला माझ्या देशभावनेचा आदर होता आणि कायम राहील", असं करण जोहरने म्हटलं आहे. मी दहशतवाद्यांचा निषेध करतो. मला जवानांचा आदर आहे. माझ्यासाठी माझा देश पहिल्यांदा आहे.  मात्र सिनेमावर बंदी घालणं, हा माझ्या सर्व क्रू मेंबरवर अन्याय आहे, असंही करण जोहरने म्हटलं आहे. मला राष्ट्रद्रोही म्हटलं गेलं. त्याचं खूप दु:ख झालं, असंही करणने नमूद केलं. माझ्यासाठी माझा देश सर्वस्वी आहे. यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला माझ्या सिनेमात स्थान नसेल, असं करण जोहरने म्हटलं आहे. मनसेचा इशारा ‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. तर शाहरुख खानच्या रईस या सिनेमाता पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडला. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला. सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशनने करण जोहरचा सिनेमा थिएटरमध्ये न प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

संबंधित बातम्या :

मनसेच्या इशाऱ्यानंतर करण जोहरचं पोलिस आयुक्तांना साकडं पाकिस्तानी कलाकारांबाबत मुकेश अंबानी म्हणतात… पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते… ‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका माहिरा खानची ‘रईस’मध्ये रिप्लेसमेंट नाही, निर्मात्याचे संकेत ‘ऐ दिल..’मध्ये फवादच्या चेहऱ्यावर ‘या’ हिरोचा मुखवटा पाक कलाकार असलेले चित्रपट दाखवणार नाही, सिंगल स्क्रीन थिएटर मालकांचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Embed widget