एक्स्प्लोर

कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर अनैसर्गिक लैंगिक संबंधाचाही आरोप; पीडितेच्या मैत्रिणीने सांगितली व्यथा

बॉलिवून अभिनेत्री कंगना रनौत हिच्या पर्सनल बॉडीगार्डवर अनैसर्गिक लैंगिक संबंधाचाही आरोप करण्यात आला आहे.पीडितेच्या मैत्रिणीने ही व्यथा सांगितली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतचा पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडे याच्यावर मुंबईतील एका ब्यूटिशियनला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. यानंतर बुधवारी कुमार हेगडे यांच्याविरुध्द मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

आरोपी कुमार हेगडे यांच्या कथित दुष्कर्मांबद्दल स्वत: पीडिता एबीपी न्यूजशी बोलली होती. पण आता तिची मैत्रिण दिव्या कोटियानने एबीपी न्यूजशी बोलताना कुमार हेगडे यांच्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

दिव्याने एबीपी न्यूजला सांगितले की, "कुमार हेगडे हा माझ्या मैत्रिणीबरोबर अनैसर्गिक लैंगिक संबंधही ठेवत होता. शारीरिक संबंध ठेवण्याअगोदर तो नशा करत असे आणि नंतर सेक्स दरम्यान कुमार तिच्याशी अत्यंत आक्रमक वागला होता." दिव्या म्हणाली की तिची पीडित मैत्रिण इतकी निरागस आहे की तिला अनैसर्गिक लैंगिक संबंधांबद्दल फारशी माहिती नव्हती. अशा परिस्थितीत ती त्याला बळी पडत राहिली.

दिव्या पुढे म्हणाली, "कुमार हेगडे याच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्याऐवजी माझ्या मैत्रिणीला आत्महत्या करायची होती. आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर तिच्या डोक्यात आत्महत्येचे विचाक येत होते. जेव्हा तिने मला याबद्दल सांगितले तेव्हा मी स्पष्ट केले की चूक करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. स्वत:ला अशा प्रकारे शिक्षा देण्याचा विचार करु नको. "

दिव्या कोटियान म्हणाली की, कुमार हेगडे याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्याची बाब तिला समजली आणि अशा परिस्थितीत तिने तिला डीएन नगर पोलिस ठाण्यात नेले.

दिव्याने तिच्या आरोप करणार्‍या मैत्रिणीचा हवाला देत सांगितले की ते दोघेही एकमेकांना 8-9 वर्षांपासून ओळखत होते. गेल्या वर्षी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवल्यापासून कुमार तिच्या मैत्रीणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.

दिव्याने तिच्या पीडित मैत्रिणीचा हवाला देत एबीपी न्यूजला सांगितले की कुमारला फक्त मुलींमध्येच नाही तर मुलांमध्येही रस आहे. तो त्यांच्याबरोबर लैंगिक संबंधही ठेवत असे. दिव्या सांगते, "कुमारने या गोष्टी माझ्या मैत्रिणीला एकदोनदा स्वत: सांगितल्या होत्या, पण, कुमार मस्करी करत असल्याचे तिला वाटले. तिने या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. मात्र, नंतर मला इतरांकडूनही अशीच माहिती मिळाली.

दिव्या पुढे म्हणाली, "कुमारने लग्नाचे आमिष दाखवून अनेक मुलींशी लैंगिक संबंध ठेवले असून नंतर त्याचा तो स्वभाव बनला होता. इतकेच नाही तर माझ्या मैत्रिणीच्या पैशाखेरीज त्याने इतर अनेक मुलींकडून पैसे घेतले होते. कुमार हेगडेने कंगना रनौतच्या अंगरक्षक असल्याचा फायदा घेत अनेक निरपराध मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं आहे.

दिव्याचे म्हणणे आहे की कुमार हेगडे आईच्या मृत्यूची खोटी बातमी सांगून कर्नाटकात गेला. मात्र, कॉमन फ्रेंड्सकडून तिला समजले की तो लग्न करण्यासाठी तिथे गेला आहे. दिव्या सांगते की, तेव्हापासून तिची पीडित फ्रेंड सतत कुमार हेगडे याच्याशी फोन व मेसेजद्वारे बोलण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु, त्यानंतर कुमारचा फोन सतत बंद येत आहे.

दिव्या म्हणाली की कुमारचा फोन बंद होता, मात्र, तिच्या मैत्रिणीला धमकी देणारे कॉल दुसर्‍याच्या फोनवरून येत आहेत. आम्हाला या संपूर्ण विषयावर कंगना रनौत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा होती. मात्र, तिच्याकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा कंगनाने अद्याप याबद्दल काहीही पोस्ट केलेले नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??

व्हिडीओ

Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Chhatrapati Shivaji Maharaj and Tipu Sultan: टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका
टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Embed widget