Kangana Ranaut: कंगनानं घेतली इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांची भेट; म्हणाली, "आधुनिक रावण हमास..."
Kangana Ranaut: कंगनानं इस्त्रायलचे राजदूत नाओर गिलॉन (Naor Gilon) यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना कंगनानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) बुधवारी (25 ऑक्टोबर) इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन (Naor Gilon) यांची भेट घेतली. कंगनानं इस्त्रायलच्या राजदूतांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना कंगनानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
कंगना रनौतनं नाओर गिलॉन यांच्यासोबतचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "भारतातील इस्रायलचे राजदूत श्री नाओर गिलॉन जी यांच्याशी भेट झाली. आज संपूर्ण जग, विशेषत: इस्रायल आणि भारत दहशतवादाविरुद्ध युद्ध लढत आहेत. काल जेव्हा मी रावण दहनासाठी दिल्लीला पोहोचले तेव्हा मला वाटले की,तेव्हा मला वाटले की, मी इस्रायल दूतावासात यावे आणि आजचा आधुनिक रावण हमाससारख्या दहशतवाद्यांना पराभूत करणाऱ्या लोकांना भेटावे."
"ज्या प्रकारे लहान मुले आणि महिलांना लक्ष्य केले जात आहे ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात इस्रायलचा विजय होईल, अशी मला पूर्ण आशा आहे. त्यांच्यासोबतच मी माझ्या तेजस या आगामी चित्रपटाबद्दल आणि भारताचे स्वावलंबी लढाऊ विमान तेजस याविषयी चर्चा केली." असंही कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं.
View this post on Instagram
कंगनाचा तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'तेजस' या चित्रपटात कंगनासोबतच वरुण मित्रा देखील प्रमुख भूमिका साकाणार आहे. कंगनाचे इमर्जन्सी (Emergency) आणि तेजस हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी तेजस या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच "भारत को छेडेंगे तो छोडेंगे नहीं" हा कंगनाचा दमदार डायलॉग ऐकू येतो. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सर्वेश मेवाडा यांनी तेजस या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून रॉनी स्क्रूवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या: