एक्स्प्लोर
हृतिक- कंगना पुन्हा एकदा आमने सामने
बॉक्स ऑफिसवर या दोघांचे चित्रपट एकमेकांशी कसे टक्कर देतात हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
मुंबई: अभिनेता हृतिक रोशन आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हे दोघे पुन्हा एकदा समोरसमोर उभे ठाकले आहेत. कंगना रनौतचा बहुचर्चित 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' चित्रपट तर हृतिकचा 'सुपर30' हा चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत. हे दोन्ही चित्रपट 25 जानेवारी 2019 ला रिलीज होणार आहेत.
हृतिकच्या 'सुपर30' या चित्रपटाची रिलीज डेट यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. पण शनिवारी 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' चे निर्माते कमल जैन यांनी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली. आता बॉक्स ऑफिसवर या दोघांचे चित्रपट एकमेकांशी कसे टक्कर देतात हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
'सुपर 30' मध्ये हृतिक गणितज्ञ आनंद कुमारच्या भूमिकेत दिसेल. 'सुपर 30' हा चित्रपट या वर्षी रिलीज केला जाणार होता पण काही कारणास्तव चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता 'सुपर 30' चित्रपट 25 जानेवारी 2019 ला रिलीज होणार आहे.
#Super30, the Anand Kumar biopic that was slated for release on 23 Nov 2018, will now release on 25 Jan 2019... Stars Hrithik Roshan... Directed by Vikas Bahl... #RepublicDayWeekend
— taran adarsh (@taran_adarsh) January 24, 2018
मणिकर्णिका या चित्रपटात कंगना रनौत झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात सोनू सूद, अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडे सुद्धा झळकळार आहेत. निर्माते कमल जैन यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली.
दीपिकाचा एक्स निहार पांड्याचं कंगनासोबत बॉलिवूड पदार्पण बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेण्ड निहार पांड्या लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'क्वीन' कंगना राणावतच्या आगामी 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटात निहार झळकणार आहे. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यावेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीशी लढा या चित्रपटात दाखवला जाणार आहे. या चित्रपटात निहार दुसऱ्या बाजीरावांच्या भूमिकेत दिसणार आहे.खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी ! @ZeeStudios_ & producer @KamalJain_TheKJ proudly announce release date of the most-anticipated magnum opus, #Manikarnika -The Queen of Jhansi on 25th January 2019.
— Kamal Jain (@KamalJain_TheKJ) July 21, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement