Kangana Ranaut Emergency Postponed:  अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) इमर्जन्सी (Emergency) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. कंगनानं या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली होती. पण आता इमर्जन्सी  या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. कंगनानं इमर्जन्सी  या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याचं कारण सांगितलं आहे. 


कंगनाचं ट्वीट


कंगनानं ट्वीटमध्ये लिहिलं, "प्रिय मित्रांनो, मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. इमर्जन्सी हा चित्रपट एक कलाकार म्हणून माझ्यासाठी शिकण्याचा आणि कमाईचा चित्रपट आहे. इमर्जन्सी हा केवळ माझ्यासाठी चित्रपट नसून एक व्यक्ती म्हणून माझ्या पात्रतेची ही परीक्षा आहे. चित्रपटाच्या टीझरला आणि इतर युनिटला सर्वांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आम्हा सर्वांना प्रोत्साहन दिले.माझ्यामध्ये  कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. मी जिथे जाते तिथे लोक मला इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल तारखेबद्दल विचारतात. आम्ही 24 नोव्हेंबर 2023 ही इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली होती. पण माझ्या बॅक टू बॅक रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या कॅलेंडरमधील सर्व बदलांमुळे आणि 2024 च्या शेवटच्या तिमाहीत ओव्हर पॅक झाल्यामुळे आम्ही इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट बदलत आहोत.  पुढील वर्षी (2024)  हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. नवीन रिलीजची तारीख लवकरच घोषित केली जाईल. "






इमर्जन्सी चित्रपटामध्ये 'हे' कलाकार साकारणार भूमिका


अनुपम खैर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे हे कलाकार इमर्जन्सी या चित्रपटात  प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कंगनाचे चंद्रमुखी 2 आणि तेजस हे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Emergency Teaser Out : "इंदिरा इज इंडिया..."; कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा दमदार टीझर आऊट!