Emergency Teaser Out : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमातील तिला फर्स्ट लूक आऊट झाला असून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. कंगनाने आता 'इमर्जन्सी' सिनेमाचा टीझर शेअर करत रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. 


'इमर्जन्सी'चा टीझर आऊट! (Emergency Teaser Out)


'इमर्जन्सी' सिनेमाच्या टीझरवर सुरुवातीलाच 25 जून 1975 असे लिहिलेलं दिसत आहे. देशात निर्माण झालेली अराजकता, सामान्य जनतेमधील असंतोष, विरोधी पक्षातील नेत्यांची धरपकड, ठिकठिकाणी होणारा हिंसाचार अशा अनेक गोष्टी टीझरमध्ये समर्पकरित्या दाखवण्यात आल्या आहेत. या टीझरमधील कंगनाच्या डायलॉगने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 






कंगनाच्या डायलॉगने वेधलं प्रेक्षकांंचं लक्ष


'इमर्जन्सी' या सिनेमातील कंगनाचे डायलॉग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. "या देशाची रक्षा करण्यापासून कोणीच मला थांबवू शकत नाही.. कारण इंडिया इज इंदिरा अॅन्ड इंदिरा इज इंडिया". टीझरमध्ये 1975 दरम्यान देशात लागू असलेल्या आणीबाणीबद्दल आणि तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची गोष्ट उलगडताना पाहायला मिळत आहे. 


'इमर्जन्सी' या सिनेमाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या टीझरमधील डायलॉगदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 'इमर्जन्सी' या सिनेमात कंगना रनौत इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 


कंगनाचा 'इमर्जन्सी' कधी रिलीज होणार? (Kangana Ranaut Emergency Release Date)


कंगनाने 'इमर्जन्सी' या सिनेमाचा टीझर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहिलं आहे,'इमर्जन्सी' 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. संरक्षक की हुकूमशहा? आपल्या देशातील नेत्याने आपल्याच लोकांविरुद्ध युद्ध घोषित केलं... तेव्हा आपल्या इतिहासातील सर्वात काळ्या काळाचा साक्षीदार व्हा". 


'इमर्जन्सी' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कंगना रनौतने सांभाळली आहे. तसेच ती या सिनेमाची निर्मितीदेखील करत आहे.  अभिनेत्रीने 2021 रोजी या सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात कंगनासह अनुपम खैर, मिलिंद सोमन, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Emergency Teaser : 'Emergency'चा टीझर रिलीज; कंगना रनौतनं साकारली इंदिरा गांधींची भूमिका