Kinjal Dave : दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) दांडिया पाठोपाठ आता किंजल दवेच्या दांडियात फसवणूकीचा प्रकार उघड झाला आहे. बनावट पासेसच्या विक्री प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. एमएचबी पोलिसांनी कारवाई केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आमदार सुनील राणे यांनी 'रंगरात्री दांडिया नाईट्स'चे आयोजन केले होते. त्यावेळी 36 लाख रुपयांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे. करण शाह, दर्शन गोहिल, परेश नेवरेकर आणि कविष पाटील यांनी या चोघांना अटक करण्यात आली आहे. 'फर्जी' (Farzi) या वेबसीरिजवरुन प्रोत्साहित होऊन नमूद गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 1000 बनावट पासेस, 1000 होलोग्राम स्टिकर लॅपटॉप आणि प्रिंटर जप्त करण्यात आले आहे.
फाल्गुनी पाठकच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून 156 तरुणांची फसवणूक
फाल्गुनी पाठकच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून 156 तरुणांची फसवणूक झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या ‘गरबा नाईट’चे पास खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 156 तरुणांना सव्वापाच लाख रुपये गमवावे लागले आहेत. आरोपीने स्वस्तात पास देण्याचे आमिष दाखवून या तरुणांची फसवणूक केली असून याप्रकरणी या तरूणांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.
किंजल दवेबद्दल जाणून घ्या... (Who is Kinjal Dave)
किंजल दवेचा 27 नोव्हेंबर 1999 रोजी गुजरातमध्ये जन्म झाला आहे. 'जगा आणि जगू द्या' हा किंजलचा जगण्याचा फंडा आहे. अहमदाबादमध्ये किंजलचं शिक्षण पूर्ण झालं आहे. पवन जोशीसोबत किंजल लग्नबंधनात अडकली. किंगल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. युट्यूबवर तिचे 20 मिलियन फॉलोअर्स आहेत. लोकांना नवी आशा दाखवायला आणि त्यांच्यावर आपला प्रभाव पाडायला किंजलला आवडतं.
'गरबा क्वीन' फाल्गुनी पाठकबद्दल जाणून घ्या... (Who is Falguni Pathak)
'गरबा क्वीन' फाल्गुनी पाठकने आपल्या संस्कृतीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. गरबा प्रकार तिने सातासमुद्रापार पोहोचवला आहे. केसरीयो रंग, ओढणी ओढू के उडी उडी जाये, वादघडी वारसी, राधा ने श्याम, परी हूँ में, यांसारखी तिची अनेक गरबा गाणी प्रसिद्ध आहेत.
संबंधित बातम्या