Anurag Dobhal : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा धमाकेदार ग्रँड प्रीमियर पार पडला असून या पर्वात अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. 'बिग बॉस 15'मध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह युट्यूबर, वकील, पत्रकार मंडळीही सहभागी झाले आहेत. 'बिग बॉस'च्या माध्यमातून बाबू भैया अर्थात अनुराग डोभाल (Anurag Dobhal) छोटा पडदा गाजवणार आहे.


'बाबू भैया' कोण आहे? (Who is Babu Bhaiya Anurag Dobhal)


युट्यूबर अनुराग डोभाल 'UK07 रायडर' आणि 'बाबू भैया' (Babu Bhaiya) या नावाने तो लोकप्रिय आहे. यूट्यूबर एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांनी 'बिग बॉस ओटीटी'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता त्यांच्याप्रमाणे अनुरागही प्रेक्षकांची मने जिंकेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनुरागचे सोशल मीडियावर 12 मिलियन फॉलोअर्स आहेत. 






'बाबू भैया'चे यूट्यूबवर सहा मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स 


अनुराग डोभालला टॅटूची प्रचंड आवड आहे. युट्यूबरने संपूर्ण शरीरावर वेगवेगळे टॅटू काढले आहेत. 'बिग बॉस'च्या मंचावर त्याच्या मानेवरील बकरीच्या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करताना युट्यूबरने सलमान खानसोबत एक खास व्लॉग शूट केला आहे. दोघांनी 'हुड हुड दबंग'च्या स्टेपवर ते थिरकले. 


'बाबू भैया' गाजवणार 'Bigg Boss 17'


अनुराग डोभाल युट्यूबवर नव-नवीन बाइक्सचे आणि प्रवासादरम्यानचे व्हिडीओ शेअर करत असतो. यूट्यूबवर सनी लिओनीसह अनेक कलाकारांसोबत त्याने व्हिडीओ बनवले आहेत. अनुरागला चाहते प्रेमाणे 'बाबू भैय्या' अशी हाक मारतात. 'बिग बॉस'च्या मंचावर अनुरागने सलमान खानसह प्रेक्षकांनाही खळखळून हसवलं. त्यामुळे 'बिग बॉस 17'मधील त्याचा प्रवास किती मनोरंजनमय असेल हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


बाबू भैयाने 2018 मध्ये व्लॉगिंगची सुरुवात केली आहे. 'द यू-के-07' असे त्याच्या चॅनलचे नाव आहे. 'बिग बॉस'साठी बाबू भैयाला अनेकदा विचारणा झाली आहे. बाबू भैयाची आई गृहिणी असून वडील सरकारी वकील आहेत. यूट्यूबर होण्याआधी बाबू भैया नोकरी करत असे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...