कंगनाची लगीनघाई! लग्नाचा ड्रेसही ठरला पण नवरदेव कोण? चाहत्यांना उत्सुकता, चर्चांना उधाण
Kangana Ranaut Marriage : कंगना राणौत ही तिच्या पोस्टमुळे कायमच चर्चेत असते. पण सध्या कंगना तिच्या लग्नामुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.
![कंगनाची लगीनघाई! लग्नाचा ड्रेसही ठरला पण नवरदेव कोण? चाहत्यांना उत्सुकता, चर्चांना उधाण Kangana Ranaut Bollywood actress will reportedly get married within next few Months Entertainment Bollywood Latest Update Marathi News कंगनाची लगीनघाई! लग्नाचा ड्रेसही ठरला पण नवरदेव कोण? चाहत्यांना उत्सुकता, चर्चांना उधाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/23/5a889411f8100840936c99eab8eefdeb1711188277282720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kangana Ranaut Marriage : सध्या मराठी हिंदी कलाविश्वात लगीनसराई सुरु आहे. ऑनस्क्रिन लग्नाचा अभिनय करणारे कलाकार खऱ्या आयुष्यात त्यांचा आयुष्याचा जोडीदार निवडतायत. नुकतच आधी रकुल प्रती सिंग (Rakul Prit Singh) आणि जॅकी भगनानी यांनी लग्नगाठ बांधली होती. पण आता पुन्हा एकदा एक अभिनेत्री लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंगना रनौत ( Kangana Ranaut) हिने तिच्या लग्नाची तयारी सुरु केल्याचं समोर आलं आहे.
कंगनाने तिच्या लग्नाचा पेहराव देखील निवडल्याचं सांगितलं जात आहे. त्याचप्रमाणे कंगनाने आपल्या लग्नाचा ड्रेस हा डिझायनरकडून तयार करुन घेणार असल्याची माहिती रेडिटकडून देण्यात आली. दरम्यान कंगनाचा हा ड्रेसचा डिझायनर इंडस्ट्रीमधीलच एक असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सध्या तरी कंगनाने तिच्या लग्नाबाबतच्या गोष्टी या खासगी ठेवण्याचा निर्णय घेतलाय. असं असलं तरीही कंगनाने तिचा बॉयफ्रेंड आहे हे मात्र कबूल केलं होतं.
कंगना कोणासोबत बांधणार लग्नगाठ?
कंगना रणौत लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. याचदरम्यान कंगनाने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला देखील हजेरी लावली होती. त्यावेळी कंगना आणि निशांत पिट्टीचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे त्या दोघांच्या अफेरच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या. पण त्यावर कंगनाने स्पष्टीकरण देत निशांत विवाहित असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर कंगना एका परदेशी व्यक्तीसोबत हात हात धरुन चालताना देखील दिसली होती. त्यामुळे कंगना आता कोणसोबत लग्नगाठ बांधणार याची उत्सुकता सध्या तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
कंगना रणौतच्या सिनेमांविषयी
कंगना ही नुकतीच इमर्जन्सी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्याचप्रमाणे चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) या सिनेमातही ती झळकणार आहे.कंगनाचा 'धाकड' हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर स्टारर 'टीकू वेड्स शेरू' या सिनेमाचीदेखील कंगनाने निर्मिती केली आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)