मुंबई : लग्नाआधीच गरोदर राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिनने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मागील काही दिवसांपासून कल्किची प्रेग्नेंसी चर्चेचा विषय ठरली होती. आता मात्र चाहते तिच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कल्कि गाय हर्शबर्ग या आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.


काही दिवसांपूर्वी आपण गरोदर असल्याची माहिती तिने फॅन्सला दिली होती. त्यावेळ लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या कल्किला अनेकांनी ट्रोलही केलं होतं. आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कल्कीने त्यावेळीही आपलं ठाम मत व्यक्त केलं होतं. मी गरोदर आहे, पण फक्त त्यासाठी मी लग्न करणार नाही, असं कल्किने त्यावेळी सांगितलं होतं. दरम्यान, शुक्रवारी रात्री कल्कि कोचलिनने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.


चाहते मात्र कल्किवर अभिनंदनाचा वर्षाव करत असून कल्किच्या लेकीची पहिली झलक पाहण्यासाठीही ते आतुर झाले आहेत. कल्कि गेल्या दोन वर्षांपासून इस्रायली पियानोवादक गाय हर्शबर्गला डेट करत आहे. दोघांनी अद्याप लग्न केलेले नाही.





कल्किने 9 महिने आपला गरोदरपणा खऱ्या अर्थाने एन्जॉय केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती नेहमी आपल्या बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. एवढचं नाहीतर तिने आपल्या बेबी बंबसोबत स्टायलिश फोटोशूटही केलं होतं. कल्किचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कल्किने आधीच सांगितल्याप्रमाणे वॉटर बर्थच्या माध्यामातून तिने मुलीला जन्म दिला.


दरम्यान, 2009मध्ये कल्कि 'देव डी' या चित्रपटातून दिसली होती. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कल्कि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर दोघांनी लग्नही केलं होतं. पण कल्कि आणि अनुरागचं हे नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी 2015मध्ये घटस्फोट घेतला. पण त्यांच्यातील मैत्री तुटली नाही. हेदोघे आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.


संबंधित बातम्या : 


'या' बॉलिवूड अभिनेत्रीचं बेबी बंप फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल


कल्की कोचलिनचं बेबी बंप फोटोशूट, फोटो व्हायरल