Kabzaa Teaser : किच्चा सुदीपच्या 'कब्जा'चा ट्रेलर आऊट; सात भाषांमध्ये प्रदर्शित होणार सिनेमा
Kabzaa Teaser : 'कब्जा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.
Kabzaa Teaser Out Now : दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीपच्या (Kichcha Sudeep) लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या किच्चा सुदीप त्याच्या आगामी 'कब्जा' (Kabzaa) सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमात किच्चा सुदीपसह उपेंद्रदेखील (Upendra) मुख्य भूमिकेत आहे.
'कब्जा' सिनेमा 'केजीएफ'सारखा असेल याचा ट्रेलरवरुन अंदाज येतो. 'कब्जा' या सिनेमाचं कथानक गॅंगस्टर्सवर आधारित आहे. 'कब्जा' सिनेमाचा ट्रेलर आऊट झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'कब्जा'चा ट्रेलर किच्चा सुदीपच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
सात भाषांमध्ये प्रदर्शित होणार 'कब्जा'
किच्चा सुदीप आणि उपेंद्रचा 'कब्जा' सिनेमाचा टीझर आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. सात भाषेत हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. यात हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलुगू आणि उडिया या भाषांचा समावेश आहे. किच्चा सुदीप आणि उपेंद्र व्यतिरिक्त 'कब्जा' सिनेमात श्रिया सरनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोणा'ने बॉक्स ऑफिसवर केली कमाल
किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोणा'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. किच्चा सुदीपसोबतच 'विक्रांत रोणा' या सिनेमात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. निरुप भंडारी, नीता अशोक, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहेत. हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित आहे.
संबंधित बातम्या