Kaali Poster Controversy : चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या 'काली' (Kaali) या माहितीपटाच्या पोस्टरमुळे देशाभरात संतापाची लाट उसळली आहे. या माहितीपटाच्या पोस्टरमध्ये काली माता साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. इतकेच नाही तर, काली मातेच्या हातात LGBTQ वर्गाचा झेंडाही दाखवण्यात आला आहे. लीना यांनी हे पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. यानंतर हे पोस्टर पाहून सोशल मीडियावरील यूजर्स आणि प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत. एकीकडे लीना यांच्यावर टीका होत असताना, या वादादरम्यान आता त्यांचे एक ट्वीट चर्चेत आले आहे.
या वादग्रस्त पोस्टरवरून झालेल्या गदारोळानंतर लीना यांनी आणखी एक ट्वीट केले आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दक्षिणात्य भाषेत असलेल्या आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. मला एक असा आवाज बनायचंय जो कधीही कुणाला घाबरणार नाही. याची किंमत जर माझा जीव असेल तरी बेहत्तर..मी तो देईन.’ या आधी त्यांनी आपल्या या चित्रपटाबाबत सांगताना लिहिले होते की, 'हा चित्रपट संध्याकाळच्या त्या घटनांभोवती फिरतो, जेव्हा तिला काली दिसते आणि ती टोरंटोच्या रस्त्यावर फिरते.’
नेमकं प्रकरण काय?
निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या या माहितीपटाचे नाव ‘काली’ आहे. या पोस्टरमध्ये माँ कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून, माँ कालीच्या वेशभूषेत ही अभिनेत्री एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत असल्याचे म्हणत सोशल मीडियावरील यूजर्स संतापले आहेत.
चित्रपट निर्मात्या लीना यांनी 2 जुलै 2022 रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याच्या ‘काली’ या माहितीपटाचे अर्थात डॉक्युमेंट्रीचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरसह कॅप्शन लिहिताना त्या म्हणाल्या होत्या की, मी खूप उत्साहित आहे कारण ‘काली’ हा माहितीपट कॅनडा चित्रपट महोत्सवात (रिदम्स ऑफ कॅनडा) लाँच करण्यात आला होता.’
हेही वाचा :