Nayanthara, Vignesh Shivan : साऊथ क्वीन अभिनेत्री नयनातारा (Nayanthara) हिने नुकतीच निर्माता-दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. नवीनच लग्न झालेलं हे जोडपं सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. लग्न पार पडल्यापासून नयनतारा आणि विग्नेश शिवन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रोमँटिक फोटो शेअर करत आहेत. नुकताच त्यांनी असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोघांना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पाहून चाहते देखील खुश झाले आहेत.


नुकताच विग्नेश शिवन याने एक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत तो पत्नी-अभिनेत्री नयनतारा हिच्या मिठीत दिसत आहे. त्यांचे चाहते या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. हा फोटो पाहून दोघेही एकमेकांच्या प्रेमात आणि संसारात रमले आहेत, याची खुणगाठ पटते.


पाहा फोटो :



विग्नेश शिवान याने हा फोटो शेअर करताना ‘Naan pirandha dhinamaey’ असे खास कॅप्शन दिले आहे. याचा अर्थ असा आहे की, तू माझा वाढदिवस आणखी खास बनवलास. चाहते या जोडीचा फोटो पाहून त्यांना कधीच नजर लागू नये, अशी प्रार्थना करत आहेत.


चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात


नयनतारा आणि विग्नेश यांच्या लग्नाला अजून एक महिनाही पूर्ण झालेला नाही. लग्नानंतर ही जोडी हनिमूनसाठी थायलंडला गेली होती. मात्र, थायलंडवरून परतल्यानंतर अभिनेत्री नयनतारा हिने तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. नयनतारा शाहरुख खानसोबत आगामी ‘जवान’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठीचे शूटिंग तिने सुरु केले आहे. या चित्रपटातून ती लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


ग्रँड लग्नसोहळा!


दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी 9 जून 2022 रोजी चेन्नईच्या महाबलीपुरममधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये जवळचे काही मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. अभिनेते रजनीकांत, शाहरुख खान, दिग्दर्शक एटली यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याच्या लग्नाला हजेरी लावली होती.


हेही वाचा :


PHOTO : शुभ मंगल... सावधान! साऊथ अभिनेत्री नयनतारा अडकली विवाह बंधनात, पाहा फोटो


Nayanthara, Vignesh Shivan : आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार नयनतारा-विग्नेशचा विवाह सोहळा