Kaali Poster Controversy : बॉलिवूड चित्रपटांमधून सातत्याने हिंदू देवदेवतांचा अपमान केला जातो, यावरून अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. आताही अशीच एक घटना घडली आहे. मात्र, यावेळी नेटकरी प्रचंड संतापले असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालय, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, सदर व्यक्तीला अटक आकारण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. ‘काली’ (Kaali Poster Controversy) नावाच्या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून हा वाद सुरु झाला आहे. चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरमुळे देशाभरात संतापाची लाट उसळली आहे.


या माहितीपटाच्या पोस्टरमध्ये काली माता साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. इतकेच नाही तर, काली मातेच्या हातात LGBTQ  वर्गाचा झेंडाही दाखवण्यात आला आहे. लीना यांनी हे पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. यानंतर आता लीना यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.


हातात सिगारेट अन् LGBTQचा झेंडा


लीना मणिमेकलाई यांच्या या माहितीपटाचे नाव ‘काली’ आहे. या पोस्टरमध्ये माँ कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून, माँ कालीच्या वेशभूषेत ही अभिनेत्री एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर पाहून सोशल मीडियावरील यूजर्स संतापले आहेत.


चित्रपट निर्मात्या लीना यांनी 2 जुलै 2022 रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याच्या ‘काली’ या माहितीपटाचे अर्थात डॉक्युमेंट्रीचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरसह कॅप्शन लिहिताना त्या म्हणाल्या की, मी खूप उत्साहित आहे कारण ‘काली’ हा माहितीपट कॅनडा चित्रपट महोत्सवात (रिदम्स ऑफ कॅनडा) लाँच करण्यात आला होता.’


पाहा पोस्ट :



एफआयआर दाखल


‘टाईम्स नाऊ’च्या माहिती नुसार आता या डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या वादग्रस्त पोस्टरबद्दल दिल्लीतील एका वकिलाने एफआयआर नोंदवला आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने या माहितीपटातील आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ क्लिप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काली मातेच्या वेशात एक महिला सिगारेट ओढताना दाखवणारे हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.


नेटकऱ्यांनी केली तत्काळ कारवाईची मागणी







हेही वाचा :


Entertainment News Live Updates 4 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या