Jitendra Joshi : "देशाची सिस्टीम बिघडली की..."; जितेंद्र जोशीचा 'रावसाहेब' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Raavsaheb Movie : अभिनेता जितेंद्र जोशीचा 'रावसाहेब' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Jitendra Joshi Raavsaheb Movie Teaser Out : अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जितेंद्रचा 'रावसाहेब' (Raavsaheb) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'रावसाहेब' सिनेमाचा टीझर जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'रावसाहेब' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखील महाजन आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'रावसाहेब' (Raavsaheb Movie Starcast)
'रावसाहेब' या सिनेमात मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकंदरीतच टीझर आऊट झाल्याने तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जिजीविशा काळे यांनी या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे.
देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं : जितेंद्र जोशी
या चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसणारी तगडी स्टारकास्ट आणि टिझरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून प्रेक्षकांची 'रावसाहेब'बद्दलची उत्कंठा ताणली गेली आहे. जितेंद्र जोशीने 'रावसाहेब'चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं...'रावसाहेब' जवळच्या चित्रपटगृहात". जितेंद्रच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
'रावसाहेब' या सीरिजबद्दल बोलताना निखिल महाजन (Nikhil Mahajan On Raavsaheb) म्हणतात,"रावसाहेब’च्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबतच खिळवूनही ठेवेल. प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा 'रावसाहेब'ला खऱ्या अर्थाने वेगळे करतो. ग्राउंडब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही".
संबंधित बातम्या