Sooraj Pancholi : सहाय्यक दिग्दर्शक ते अभिनेता; जिया खान प्रकरणी निर्दोष सुटका झालेला सूरज पांचोली कोण आहे?
Sooraj Pancholi : जिया खान मृत्यूप्रकरणी सूरज पांचोलीला मोठा दिलासा मिळाला आहे.
Sooraj Pancholi : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीला (Sooraj Pancholi) मोठा दिलासा मिळाला आहे. पुराव्यांअभावी त्याची निर्दोष सुटका झाली आहे. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सूरजवर लावण्यात आला होता. आता निर्दोष सुटका झाल्यानंतर सूरज म्हणाला की,"सत्याचा नेहमी विजय होतो".
सूरज पांचोली कोण आहे? (Who Is Sooraj Pancholi)
सूरज पांचोली (Sooraj Pancholi) हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आदित्य पांचोली यांचा हा मुलगा आहे. सूरजने अभिनयासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनदेखील काम केलं आहे. सूरजने वयाच्या नवव्या वर्षी मार्शल आर्टचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.
View this post on Instagram
सूरजचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आहे. शाळेत असताना तो दोन वेळा नापास झाला होता. शिक्षणात गोडी न निर्माण झाल्यामुळे सूरजने बारावीत असतानाचं शिक्षण सोडलं. अभ्यासात गोडी न लागल्याने सूरजने 2010 साली संजय लीला भन्साळींच्या 'गुजारिश' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सूरजने सांभाळली होती.
सूरज पांचोलीचा सिनेप्रवास (Sooraj Pancholi Filmy Career)
'गुजारिश' या सिनेमानंतर सूरज पांचोलीला अभिनयाची गोडी लागली. त्याने तीन महिन्यांचं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. सूरज बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) मोठा चाहता आहे. त्यामुळे सलमानच्या सांगण्यावरुन त्याने 'एक था टायगर' या सिनेमाच्या सहाय्यक दिग्दर्शनाचं काम केलं.
सूरजने 2015 साली प्रदर्शित झालेल्या 'हिरो' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. 'टाइम टू डान्स', 'हवा सिंह' या सिनेमांतदेखील सूरज झळकला. सूरजला फिल्मफेअर, स्टार डस्ट, स्टार गिल्ड सारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हे सर्व पुरस्कार त्याला त्याच्या पहिल्या 'हिरो' या सिनेमासाठी मिळाले आहेत.
सूरज पांचोली कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक (Sooraj Pancholi Net Worth)
सूरज पांचोली सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सूरज एका सिनेमातील दोन ते तीन कोटी मानधन घेतो. मुंबईतील जुहू भागात त्याचं आलिशान घर आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला सूरज आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
संबंधित बातम्या