Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Isha Ambabi : ईशाने एका मुलाखतीत, आपल्यालाही हिंदी चित्रपट पाहून रडू येत असल्याचे सांगितले आहे. शाहरुखच्या तीन चित्रपटांमुळे डोळ्यात अश्रू येत असल्याचे ईशाने सांगितले.
Isha Ambabi : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याप्रमाणे त्यांची तिन्ही मुले चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानी (Isha Ambabi) रिलायन्सच्या संचालक मंडळावर असून रिलायन्सच्या अखत्यारीत असलेल्या कंपन्यांची जवाबदारी तिच्या खांद्यावर आहे. ईशाने एका मुलाखतीत, आपल्यालाही हिंदी चित्रपट पाहून रडू येत असल्याचे सांगितले आहे. शाहरुखच्या तीन चित्रपटांमुळे डोळ्यात अश्रू येत असल्याचे ईशाने सांगितले.
या चित्रपटांमुळे ईशाच्या डोळ्यात अश्रू
मुलाखतीदरम्यान ईशाला विचारण्यात आले की, तिला रडवणारे चित्रपट कोणते आहेत? 'व्होग इंडिया'च्या प्रश्नाला उत्तर देताना ईशा म्हणाली, "कुछ कुछ होता है (1998), कभी खुशी कभी गम (2001) आणि कल हो ना हो (2003)…हे असे तीन चित्रपट आहेत जे पाहून मी नेहमी रडते."
कोणत्या दिग्दर्शकाची फॅन आहे ईशा?
यानंतर ईशाला विचारण्यात आले की तिची आवडती गाणी कोणती आहेत जी ती नेहमी गुणगुणते? ईशा म्हणाली, "मी करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनची खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे मी त्यांच्या चित्रपटांची गाणी फुल व्हॉल्यूममध्ये गाते, असे ईशाने हसत सांगितले.
अनंतच्या लग्नात व्यस्त आहे ईशा
ईशा अंबानी सध्या भाऊ अनंत अंबानीच्या लग्नाच्या तयारीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.
2018 मध्ये विवाहबद्ध झाली होती ईशा
उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही 12 डिसेंबर 2018 रोजी पिरामल ग्रुपचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. देशातल्या सर्वात महागड्या विवाह सोहळ्यांपैकी हा एक होता. या विवाह सोहळ्यात प्रसिद्ध उद्योगपती आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती.
ईशा अंबानीचे पती आनंद पिरामल हे अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आहे. पिरामल ग्रुपचे ते नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहतात. त्यांचे आई-वडील याच कंपनीचे संस्थापक आहेत. आनंद पिरामल यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल, बोस्टन येथून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवीही मिळवली. 31 मार्च 2023 पर्यंत पिरामल समूहाची एकूण मालमत्ता 83,752 कोटी रुपये होती.