एक्स्प्लोर

Ira Khan's Engagement : आमिर खानच्या लेकीचा एंगेजमेंट सोहळा थाटामाटात पार; सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबियांची उपस्थिती

Ira Khan's Engagement : आमिर खानची मुलगी आयरा खानची शुक्रवारी मुंबईत एंगेजमेंट झाली. लाल गाऊनमध्ये आयरा खान खूपच सुंदर दिसत आहे.

Ira Khan's Engagement : बॉलिवूड अभिनेता आमिर (Aamir Khan) खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आज मुंबईत एंगेजमेंट सोहळा पार पडला. या एंगेजमेंटच्या निमित्ताने एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आयरा खान लाल गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या एंगेजमेंट सोहळ्याला आमिर खानसह संपूर्ण कुटुंबियांची उपस्थिती पाहायला मिळाली. 

यावेळी आमिर खानही पांढऱ्या कुर्त्यामध्ये हटके स्टाईलमध्ये दिसला. आयरा खानच्या एंगेजमेंटसाठी संपूर्ण खान कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित होते. यामध्ये आमिर खान, किरण राव, आयराचा भाऊ जुनैद खान, आझाद राव खान यांच्यासह जवळची मित्र मंडळीही उपस्थित होती.

ऑक्टोबरमध्ये रिंग देऊन केले प्रपोज 

आयरा खान आणि नुपूर शिकरे हे दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करतायत. एका कार्यक्रमादरम्यान नुपूरने आयराला रिंग देऊन प्रपोजदेखील केले आणि गुडघ्यावर बसून, अंगठी देऊन लग्नाची मागणी घातली होती. या प्रसंगाचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 

दोन वर्षांपासून डेटिंग!

आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. नुपूर हा पेशाने फिटनेस ट्रेनर आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही त्यांच्या क्यूट आणि रोमँटिक फोटो-व्हिडींओंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. आयरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. 1997 मध्ये आयराचा जन्म झाला होता. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत. अभिनेता असणाऱ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी, आयराने दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याच्या मागे स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. तिने 2019 मध्ये थिएटर प्रोडक्शन हाऊस 'युरिपाइड्स' मीडियाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

आमिर खानच्या लूकवर विशेष चर्चा 

लेकीच्या एंगेजमेंट सोहळ्यासाठी आमिर खाननेही विशेष तयारी केली होती. या सोहळ्या दरम्यान आमिर खानने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. त्याचबरोबर या लूकला आमिर खानची पांढरी दाढीही शोभून दिसत होती. या लूकला शोभेल असा आमिरने काळ्या रंगाचा गॉगलही घातलेला दिसला. एकंदरीतच आमिरच्या या हटके लूकची त्याच्या चाहत्या वर्गात चर्चा होतेय.   

महत्वाच्या बातम्या : 

Ira Khan : आमिर खानच्या लेकीची एंगेजमेंट रिंग पाहिलीत का? आयराने व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक!

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget