एक्स्प्लोर

Independence Day 2022 : शाहरुखच्या ‘मन्नत’वर डौलाने फडकला तिरंगा! अभिनेत्याने कुटुंबासह चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

Independence Day 2022 : अभिनेता शाहरुख खान याने ‘मन्नत’वर तिरंगा फडकावत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

Independence Day 2022 : आज (15 ऑगस्ट) आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75वर्षे पूर्ण होत आहेत. देशभरात आज हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Independence Day 2022 ) साजरा केला जात आहे. या खास निमित्ताने देशभरात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) हा उपक्रम राबवला जात आहे. सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण या उपक्र्र्मात सहभागी होत आहेत. या खास सेलिब्रेशनसाठी बॉलिवूड सेलिब्रिटीही आपल्या घरात तिरंगा फडकावून सहभागी होत आहेत. अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने ‘मन्नत’वर तिरंगा फडकावत या उपक्रमात सहभाग घेतला आहे. शाहरुख खानने पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि मुले आर्यन खान (Aryan Khan) आणि अबराम खान (Abram Khan) यांच्यासह त्यांच्या घरी अर्थात 'मन्नत' वर तिरंगा फडकावला आणि 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभाग नोंदवला.

बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान याने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच, त्याने चाहत्यांना आणि देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिरंगा फडकवल्यानंतर शाहरुख खानने कुटुंबासोबत फोटो देखील काढला. या फोटोत शाहरुख खानसह त्याची पत्नी गौरी खान आणि मुले अबराम आणि आर्यन दिसत आहेत.

किंग खानने ट्विटरवर देशाचे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानावर एक पोस्ट लिहित ध्वजारोहणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. शाहरुखने लिहिले की, ‘मी माझ्या मुलांना भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या लढयाबद्दल आणि बलिदानाबद्दल शिकवत आहे. त्यांना आणखी काही गोष्टी शिकवायच्या आहेत. पण, या निमित्ताने सर्वात लहान व्यक्तीने म्हणजेच अबरामने घरी तिरंगा फडकवला आहे. आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो आहे.’

पाहा पोस्ट :

https://twitter.com/iamsrk/status/1558816378408378368?s=20&t=03qD4wd5LK6e22_AQMXsXQ

गौरीनेही शेअर केली पोस्ट

शाहरुख खानची पत्नी आणि इंटिरियर डिझायनर गौरी खानने इंस्टाग्रामवर स्वातंत्र्य दिनापूर्वीच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर अनेक चाहते प्रतिक्रिया देत ​​आहेत. फोटो शेअर करताना गौरीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.'  शाहरुख खानच्या या स्वातंत्र्य दिन सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडिया यूजर्समध्ये चांगलेच पसंत केले जात आहेत.

शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रतीक्षा

अभिनेता शाहरुख खान लवकरच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ या थ्रिलर चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत दिसणार आहे. ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय शाहरुख साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत एटलीच्या ‘जवान’ या चित्रपटातही दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय शाहरुख राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’मध्ये अभिनेत्री तापसी पन्नूसोबत झळकणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Medha Manjrekar Reaction On Cancer: 'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Bishnoi Gang Targets Aamir Khan: 'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, सोशल मीडियावर धमकी
'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, जीवेमारण्याची धमकी
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget