एक्स्प्लोर
नव्यासोबतच्या 'मिस्ट्री मॅन'चा अखेर खुलासा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदासोबत दिसलेल्या मिस्ट्री मॅनचा खुलासा अखेर झाला आहे.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदासोबत दिसलेल्या मिस्ट्री मॅनचा खुलासा अखेर झाला आहे.
नव्या काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत जुहूमधील थिएटरमधून बाहेर पडताना दिसली होती. यावेळी कॅमेरा दिसताच हा तरुण आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता.
हा तरुण नव्याच्या फ्रेण्ड सर्कलमधील आहे, ज्याला कॅमेऱ्याची फारशी सवय नाही, असं म्हटलं जात होतं. पण एका वेबसाईटच्या बातमीनुसार हा तरुण दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिझान आहे.
नव्या आणि मिझान अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. शिवाय ते चांगले मित्रही आहेत.
कॅमेरा पाहताच नव्याच्या मित्राने चेहरा लपवला!
मिझानही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. मात्र तो कोणत्या सिनेमातून डेब्यू करणार आहे, याबाबत अद्याप समजलेलं नाही.
नव्या परदेशात शिक्षण घेते आणि सध्या मुंबईत सुट्टीसाठी आली आहे. तर नव्या कायमच आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement