एक्स्प्लोर
तैमूरनंतर दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करताय?, करीना म्हणाली...
तैमूर अली खानच्या जन्मानंतर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या आयुष्यात अनेक बदल घडले आहेत.

मुंबई : तैमूर अली खानच्या जन्मानंतर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या आयुष्यात अनेक बदल घडले आहेत. पण तैमूर आमचं एकमेव बाळ असेल, असं करीनाने नुकतंच स्पष्ट केलं.
न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरच्या 'प्रेग्नन्सी नोट्स: बिफोर, ड्यूरिंग अॅण्ड आफ्टर' या पुस्तक प्रकाशनावेळी करीनाने तिचं खासगी आयुष्य आणि तैमूरबाबत भाष्य केलं.
यावेळी तैमूरनंतर दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करत आहात का, असा प्रश्न काही पत्रकारांनी करीनाला विचारला. यावर ती म्हणाली की, "माझा आणि सैफचा असा कोणताही इरादा नाही. त्यामुळे तैमूर हा करीना आणि सैफचा एकुलता एक मुलगा असेल."
दरम्यान, लवकरच 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात करणार आहे. "मी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना सैफ अली खान तैमूरसोबत असेल. यासाठी सैफ त्याच्या तारखा पुढे ढकलेल. अशाप्रकारे आम्ही दोघे आलटून पालटून तैमूरची काळजी घेऊ," असंही करीनाने सांगितलं.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर जन्मापासूनच चर्चेत आहे. सोशल मीडियावर सतत त्याचे फोटो व्हायरल होत असतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
