Ranbir Kapoor : "मला गोमांस खायला आवडतं"; 'बॉयकॉट ब्रम्हास्त्र' दरम्यान रणबीरचा व्हिडीओ चर्चेत
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'बॉयकॉट ब्रम्हास्त्र'मुळे चर्चेत आला आहे.
Ranbir Kapoor : सध्या बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे नेटकरी बॉयकॉट करत आहेत. यात अक्षय कुमार, आमिर खान, शाहरुख खान अशा सुपरस्टार्सच्या सिनेमांचा समावेश आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूच्या (Ranbir Kapoor) 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) सिनेमालादेखील नेटकऱ्यांनी बॉयकॉट करायला सुरुवात केली आहे. "मला गोमांस खायला आवडतं", असं रणबीर म्हणाल्याने 'ब्रम्हास्त्र' सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी नेटकरी करत आहेत.
रॉकस्टार या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील रणबीरचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. "मला गोमांस खायला आवडतं", असं रणबीर या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. त्यामुळे "आम्ही गोमांस खाणाऱ्या कलाकाराला प्रोत्साहन देत नाही", 'ब्रम्हास्त्र' सिनेमाला बॉयकॉट करा अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत".
Shiva of #Brahmastra in real life.#BoycottBrahmastra pic.twitter.com/JR1w6zzav7
— Kreately.in (@KreatelyMedia) August 28, 2022
ऋषी कपूर यांनीदेखील एक वादग्रस्त ट्वीट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी गोमांस खास असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. आता रणबीरचा "मला गोमांस खायला आवडतं" म्हणतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
9 सप्टेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता नागार्जुन यांचाही या मल्टीस्टारर चित्रपटात समावेश आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. अयान मुखर्जीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' (Kesariya) गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने सर्वाधिक व्ह्यूजचा रेकॉर्ड केला आहे. अरिजीत सिंहने हे गाणं गायलं आहे. तर प्रीतमने संगीतबद्ध केलं आहे. तसेच या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत.
संबंधित बातम्या