एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ठाकरे' सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला तुडुंब गर्दी
नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेला ठाकरे चित्रपट आज (25 जानेवारी) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. मुंबईतील वडाळ्याच्या कार्निव्हल चित्रपटगृहात भल्या पहाटे साडेचार वाजता चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला तुडुंब गर्दी झाली आहे.
या शोसाठी संपूर्ण सिनेमागृह सजवण्यात आलं होतं. पहाटे चार वाजता आधी पूजा करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला. शोचं उद्घाटन या चित्रपटाचे दिगदर्शक अभिजीत पानसे यांनी केलं. यावेळी ढोलताशा पथकाच्या गजरात या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शोला सुरुवात झाली.
'ठाकरे' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान मानापमान नाट्याविषयी विचारलं असता, दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी नाराजी नसल्याचं सांगितलं. तसंच पानसेंनी चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला.
नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
संबंधित बातम्या
'ठाकरे'च्या निर्माते आणि दिग्दर्शकांमधील वाद शिगेला
'ठाकरे' स्क्रीनिंगला मानापमान नाट्य, संजय राऊत यांची सारवासारव
मनसेने 'ठाकरे' चित्रपटाला शुभेच्छा दिल्या, पण....
बाळासाहेब ठाकरे 'अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख' नव्हते : संजय राऊत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजय राऊत 'माझा' कट्ट्यावर ठाकरे सिनेमातील 'आया रे सबका बापरे...' गाणं प्रदर्शितसत्तर रुपयांचा 'शिववडा' खात थिएटरमध्ये 'ठाकरे' पाहा!
'ठाकरे' साठी दोन हिंदी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या!
'ठाकरे' सिनेमातील संवादावर अभिनेता सिद्धार्थचा आक्षेप
'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही : बाळा लोकरे
बायोपिकच्या सिक्वलचाही विचार, 'ठाकरे' च्या ट्रेलर लॉन्चिंगला दिग्गजांची उपस्थिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement